लियाम प्लंकेट (Photo Credit: Twitter/@cricketworldcup)

वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट (Liam Plunkett) चालू हंगामाच्या अखेरीस इंग्लिश क्रिकेट  (English Cricket) सोडण्याच्या तयारीत आहे आणि यंदाच्या वर्षी मेजर लीग क्रिकेटमध्ये  (Major League Cricekt) खेळण्यासाठी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला (USA) रवाना होणार आहे. 2005 मध्ये इंग्लंडमध्ये (England) पदार्पण करणारा प्लंकेट, यंदा हंगामाच्या अखेरीस त्याच्या काऊंटी संघ, सरेची (Surrey) साथ सोडेल आणि क्लबसोबत तीन वर्षांचा कार्यकाळ संपवून, अमेरिकेत आगामी टी-20 लीगमध्ये खेळेल. “गेल्या तीन वर्षांत मला मिळालेल्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी मी सरे येथील सर्वांचे आभार मानू इच्छितो. हा एक अविश्वसनीय क्लब आहे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान होता. 36 वर्षीय इंग्लंड संघाचा भाग होता ज्याने 2019 मध्ये विश्वचषक जिंकला, त्याच वर्षी तो सरेमध्ये सामील झाला. इंग्लंडने त्याने खेळलेल्या विश्वचषकातील सातही सामने जिंकले.

मेजर लीग क्रिकेट ही एक नवीन अमेरिकन टी-20 लीग आहे जी 2022 पासून सुरु होत असून प्लंकेट मायनर लीग क्रिकेटच्या ईस्टर्न डिव्हिजनमध्ये फिलाडेल्फियन्सकडूनही खेळत आहे. विशेष म्हणजे प्लंकेटची पत्नी अमेरिकन आहे, आणि त्याने यापूर्वी भविष्यात एका टप्प्यावर युनायटेड स्टेट्ससाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या कारकिर्दीच्या पुढील टप्प्यात जाताना प्लंकेट म्हणाला, “माझ्या कारकीर्दीच्या पुढील टप्प्यावर जाताना, मेजर लीग क्रिकेटमध्ये सामील होण्याची संधी मिळाल्याने आणि अमेरिकेमध्ये खेळ वाढवण्यासाठी माझे लक्ष केंद्रित करण्यावर मला आनंद होत आहे. मी इंग्लंडसोबत एक विलक्षण कारकीर्द अनुभवली आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, अमेरिकेत खेळ आणि कोचिंग या दोन्ही क्षमतांमध्ये हा खेळ उभा करण्यात मदत करण्यात मला आनंद होत आहे. याव्यतिरिक्त, मी मायनर लीग क्रिकेटमध्ये फिलाडेल्फियन्ससाठी खेळण्यास सक्षम होऊन अमेरिकेतील आमच्या घराजवळील संघाला पाठिंबा देण्यास उत्सुक आहे,” 2019 मध्ये सरे CCC मध्ये सामील झालेल्या प्लंकेटने निवेदनात म्हटले आहे.

36 वर्षीय खेळाडूने तब्ब्ल 14 वर्षांच्या कारकिर्दीत इंग्लंडसाठी 13 कसोटी, 89 वनडे आणि 22 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने कसोटीत 41, वनडे सामन्यात 135 आणि सर्वात कमी स्वरूपात 25 विकेट्स घेतल्या आहेत.