ENG vs WI Test: माइकल होल्डिंग यांना लाईव्ह टीव्हीवर अश्रू अनावर, #BlackLivesMatter वर दिला शक्तिशाली संदेश (Watch Video)
माइकल होल्डिंग (Photo Credit: Getty)

वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज फलंदाज माइकल होल्डिंग (Michael Holding) वर्णद्वेषाच्या (Racism) त्यांच्या काही अनुभवांबद्दल बोलताना भावनिक झाले आणि म्हणाले की समाज बदलला पाहिजे. स्काय स्पोर्ट्स क्रिकेटने निर्मित Black Lives Matterवर अत्यंत शक्तिशाली व्हिडिओ मेसेज दिल्यानंतर आज सकाळी थेट टेलिव्हिजनवर होल्डिंग अश्रू अनावर झाले पण त्यांनी वेळीस स्वतःला सावरले. व्हिडीओमध्ये इंग्लंड (England)-वेस्ट इंडीजमध्ये (West Indies) साऊथॅम्प्टन येथे होल्डिंग आणि इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटू एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट यांच्यात क्रिकेटमधील वर्णद्वेषाबद्दल प्रतिबिंबित केले. इंग्लंडच्या महिला संघात प्रतिनिधित्व करणारी पहिली ब्लॅक खेळाडू म्हणून तिला नेहमीच स्वत: ला इतर लोकांसमोर सिद्ध करावे लागेल असे सांगत रेनफोर्ड-ब्रेंट भावुक झाली. (ENG vs WI 1st Test: 4 महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा रुळावर, Post-Coronavirus लागू होणाऱ्या नियमांबद्दल जाणून घ्या)

होल्डिंगने जागतिक समाजात वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे याबद्दल लाइव्ह टीव्हीवर सह जाणकार इयान वॉर्ड आणि नासिर हुसैन यांच्याशी उघडपणे बोलले त्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज, 8 जुलै पासून साउथॅम्प्टनमध्ये सुरु होणार आहे. मात्र, पावसामुळे सामन्याच्या टॉसला उशीर होत आहे.

पाहा हा व्हिडिओ:

एबोनी रेनफोर्ड-ब्रेंट

इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमधील तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघातील खेळाडू आपल्या जर्सीवर ब्लॅक लाईव्ह मॅटरचा लोगो लावून खेळतील. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यांनी एका निवेदनात म्हटले की ब्लॅक समुदायाबरोबर एकता दर्शविणे व समानता आणि न्यायाबद्दल आवश्यक जागरूकता निर्माण करणे महत्वाचे आहे. रूट म्हणाला की इंग्लंडचे खेळाडू आणि व्यवस्थापन या कार्यात एकवटलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यासपीठाचा उपयोग जेथे जेथे असेल तेथे वर्णद्वेषाचे पक्षपात दूर करण्याच्या उद्देशाने पूर्ण समर्थन करेल.