स्टुअर्ट ब्रॉड (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने (Stuart Broad) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) मॅन्चेस्टर येथे सुरु असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या सामन्यात एका खास कामगिरीची नोंद केली. हा पराक्रम करणारा ब्रॉड फक्त सातवा आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला. मॅन्चेस्टरच्या एजस बाउल (Ageas Bowl) मैदानावर इंग्लंड (England) आणि वेस्ट इंडिजमध्ये मालिकेतील अखेरचा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी ब्रॉडने विंडीजच्या  क्रेग ब्रॅथवेटची (Kraigg Brathwaite) विकेट घेताच गोलंदाजांच्या '500 विकेट क्लब'मध्ये एंट्री केली. विशेष म्हणजे, क्रेग हा जेम्स अँडरसनचा 500 वा कसोटी बळी होता. कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणे ही एक मोठी कामगिरी मानली जाते कारण जर आपण रेकॉर्ड बुक पहिले तर आपल्याला ज्वेल की आजवर केवळ 6 गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. मुथय्या मुरलीधरन 800, शेन वॉर्न 708, अनिल कुंबळे 619, जेम्स अँडरसन 589, ग्लेन मॅकग्रा 563 आणि कोर्टनी वॉल्स यांनी 519 गडी बाद केले आहेत. कसोटीत प्रथम वेस्ट इंडीजच्या वॉल्शने 500 विकेट्स घेतल्या होत्या. (Richards-Botham Trophy: इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये 'या' नव्या नावाखाली खेळली जाणार कसोटी मालिका, विस्डेन ट्रॉफी रिटायर होणार)

399 धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीज टीमने तिसऱ्या दिवशी 10 धावांवर 3 विकेट गमावल्या. पहिल्या कसोटी सामन्यातून वगळल्यानंतर ब्रॉड शानदार फॉर्ममध्ये असणाऱ्या ब्रॉडने दुसर्‍या कसोटीत 6 विकेट्स घेतल्या. दरम्यान, ब्रॉडने सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात 22 धावांवर 6 विकेटच्या मोबदल्यात इंग्लंडला विजयाच्या टोकापर्यंत नेले आहे. ब्रॉडने सध्या 140 कसोटी सामन्यात 499 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडकडून फक्त जेम्स अँडरसनने 500 हुन अधिक टेस्ट विकेट्स घेतल्या आहेत.

आयसीसीने इंग्लंड वेस्ट इंडीज कसोटी मालिकेपूर्वी ट्विट केले होते. या कामगिरीसह आता तो इंग्लंडचा दुसरा गोलंदाज आणि जगातील सहावा गोलंदाज बनला आहे. दुसरीकडे, मालिकेच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने विंडीजला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले आहेत. पहिल्या डावात ओली पोप, जोस बटलर आणि ब्रॉड तर दुसऱ्या डावात रोरी बर्न्स, जो रूट आणि डॉम सिब्ली यांनी निर्णायक कामगिरी केली.