Eng vs NZ, Cricket World Cup Final: बेन स्टोक्स आणि सचिन तेंडूलकर वरील ICC च्या 'त्या' ट्विटवर नेटकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
Sachin Tendulkar and Ben Stokes (Photo Credits: Twitter)

रविवारी (14 जुलै) रंगलेल्या आईसीसी क्रिकेट वर्ल्डकप मधील अंतिम सामन्यात इंग्लंड संघ पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला. क्रिकेट या खेळाला जन्म देणाऱ्या या देशाने पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला. हा सामना देखील रोमांचक आणि रंजक ठरला. न्युझीलंड विरुद्ध रंगलेल्या या सामन्यात इंग्लड टीमसमोर 242 धावांचे लक्ष्य होते. बेन स्टोक्सच्या दमदार नाबाद 84 आणि जोस बटलर च्या 59 धावांच्या खेळीने इंग्लड संघाने 241 धावा केल्या. त्यामुळे टाय झालेल्या या सामन्यात सुपर ओव्हरचा आधार घ्यावा लागला. (इंग्लंडची ऐतिहासीक कामगिरी, न्यूझीलंडचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करत पहिल्यांदा जिंकले विश्वचषक जेतेपद)

सुपर ओव्हर घेणारा हा वर्ल्डकप मधील पहिला अंतिम सामना ठरला. या सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने 15 धावा केल्या. त्यामुळे किवींपुढे 16 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्यापर्यंत पोहचत असतानाचा शेवटची धाव काढताना न्युझीलंडचा गडी बाद झाला. त्यामुळे पुन्हा सामना टाय झाला. मात्र अधिक चौकार मारल्याने इंग्लंड संघाने विजयाला गवसणी घातली. XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)

या सामन्यानंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्सला 'मॅन ऑफ द मॅच'चा किताब मिळाला. या वेळेसचा सचिन तेंडूलकर सोबतचा फोटो आईसीसीने ट्विटर अकाऊंटवर शेअर करत लिहिले की,

"आतापर्यंतचा सर्वात महान क्रिकेटर आणि सचिन तेंडूलकर."

ICC ट्विट:

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

आईसीसीच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कारण सचिन तेंडूलकर महान क्रिकेटर असून त्याची तुलना कोणाशीही केलेली चाहत्यांना रुचणार नाही.