ENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री  Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)
XXX Porn Site Promoter In The Ground During ENG vs NZ Match (Photo Credits: Twitter)

काल,आयसीसी विश्वचषक (ICC World Cup)  स्पर्धेतील यजमान इंग्लंड (England) व न्यूझीलँड (New Zealand) या दोन संघांमध्ये अंतिम लढत रंगली होती, अक्षरशः अटीतटीच्या या सामन्यात इंग्लंडने मोक्याच्या क्षणी विजय मिळवत जगज्जेते पदावर आपले नाव कोरले. या सामन्यात अगदी शेवटच्या क्षणापर्यंतही नेमकं कोणाचं पारडं जड आहे याचा अंदाज लावणे कठीण होते, यामुळे दोन्ही संघाच्या चाहत्यांमध्ये चिंता, उत्सुकता असा संमिश्र भाव पाहायला मिळत होता, पण इतक्यात मैदानात असं काही घडलं की ज्यामुळे सगळे क्रिकेटप्रेमी चिंता विसरून डोळे विस्फारून बघत राहिले. सामना सुरु असतानाच एलिना वुलित्‍सकी (Elena Vulitsky) नामक एका 47 वर्षीय महिलेने मैदानात धाव घेतली. यावेळी तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते ज्यावर विटाली अनसेंसर्ड (Vitaly Uncensored)असे लिहिले होते. ही महिला XXX या पॉर्न साईटचा मालक विटाली डोरोवेत्‍सकी याची आई आहे.

XXX या पॉर्न साईटची जाहिरात करण्यासाठीच तिने मैदानात धाव घेतली होती. यानंतर,सुरक्षा रक्षकांनी तिला पकडून मैदानाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही ती ऐकत नसल्यानी अखेरीस त्यांना या महिलेला उचलून बाहेर काढावे लागले, या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

(Watch Video)

एलिना यांचे फोटो व्हायरल होताच यावर विटाली डोरोवेत्‍सकी, याने सुद्धा ट्विटरवरून आपली आई वेडी आहे असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर त्याच्या सोबतच अन्य नेटकऱ्यांनी सुद्धा एलिनाचे फोटो शेअर करत तिला बिनधास्त म्हंटले आहे.

Vitaly Zdorovetskiy ट्विट

यापूर्वी विटाली डोरोवेत्‍सकी याची गर्लफ्रेंड सुद्धा विटाली अनसेंसर्ड या साईटची जाहिरात करण्यासाठी युरोपियन चॅम्पियन्स लीग दरम्यान अशाच प्रकारे मैदानात उतरली होती, त्यावेळेसही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कालच्या सामन्यात न्यूझीलँडचा संघ फलंदाजी करत असताना हा संपूर्ण प्रकार घडला