ENG vs NZ 1st Test 2021: न्यूझीलंड विरोधात मैदानात James Anderson ने रचला इतिहास, माजी इंग्लंड कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या या विक्रमाची केली बरोबरी
जेम्स अँडरसन (Photo Credit: Instagram)

ENG vs NZ 1st Test 2021: इंग्लंड (England) संघाचा ज्येष्ठ वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) बुधवारी देशासाठी सर्वाधिक कसोटी सामन्यांच्या माजी कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकच्या  (Alaister Cook) विक्रमाची बरोबरी केली. न्यूझीलंड (New Zealand) विरोधात लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड (Lords Cricket Ground) येथील पहिला कसोटी सामना अँडरसनच्या कसोटी करिअरमधील 161 वा सामना आहे. कूकने सामन्यातील प्रदीर्घ स्वरुपात पहिला सामना खेळल्याच्या तीन वर्षांपूर्वी मे 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 38 वर्षीय अँडरसनने लॉर्ड्स ग्राउंड येथे कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता. डेब्यू कसोटी सामन्यात अँडरसनने सामन्याच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेत इंग्लंडला डाव आणि 92 धावांनी विजय मिळवून दिला होता. उल्लेखनीय म्हणजे, 150 पेक्षा अधिक कसोटी सामने खेळणारा अँडरसनचा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. 49 कसोटींमध्ये अँडरसनचे नेतृत्व करणाऱ्या कूकने सप्टेंबर 2018 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. (ENG vs NZ Test 2021: इंग्लंडचा James Anderson विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडण्यापासून फक्त 6 पावले दूर)

दरम्यान, 614 विकेट्ससह अँडरसन हा इंग्लंडचा आतापर्यंतचा सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा आणि 600 पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. इंग्लंडचे सध्या कसोटी क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक आहे ज्यात वर्षाच्या अखेरीस अ‍ॅशेस मालिकेपूर्वी भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. आयपीएल खेळल्या बहुतेक खेळाडूंना इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे, अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांसारखे अनुभवी खेळाडू मैदानात आहेत ज्यांच्याकडून इंग्लिश क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा मोठ्या अपेक्षा आहे विशेषतः जेव्हा जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

दुसरीकडे, 38 वर्षीय अँडरसनने 2015 पासून कसोटी कारकीर्द वाचवण्यासाठी कोणताही वनडे आणि टी-20 सामना खेळलेला नाही. अँडरसन प्रथम श्रेणी कारकीर्दीत 1000 विकेट घेण्यापासून फक्त 8 विकेट दूर आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या सामन्यापूर्वी अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या 259 सामन्यांमध्ये 992 विकेट्स घेतल्या आहेत. अँडरसनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरबद्दल बोलायचे तर त्याने 374 सामन्यात 901 बळी घेतले आहेत. असा पराक्रम करणारा तो इंग्लंडचा पहिला गोलंदाज आणि जगातील सहावा गोलंदाज आहे. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन 1347 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे.