Delhi vs Manipur: दिल्ली क्रिकेट संघाने टी-20 मध्ये नवा इतिहास रचला आहे. सय्यद मुश्ताक अली (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 स्पर्धेत दिल्ली संघाने सर्व 11 गोलंदाजांचा वापर केला. कोणत्याही संघाच्या सर्व 11 गोलंदाजांनी गोलंदाजी करण्याची टी-20 इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. शुक्रवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 च्या गट सी सामन्यात मणिपूर विरुद्ध खेळताना, आयुष बडोनीच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघाने नियुक्त केलेल्या यष्टीरक्षकासह सर्व 11 खेळाडूंना किमान एक षटक दिले. यष्टिरक्षक आणि कर्णधार आयुष बडोनीने दोन षटके टाकली आणि एक विकेटही घेतली. आयुष बडोनी गोलंदाजी करत असताना, संघाचा आणखी एक यष्टीरक्षक-फलंदाज अनुज रावतने यष्टिरक्षणाची जबाबदारी घेतली.
All of the 11 bowled for Delhi in SMAT. 🤯 pic.twitter.com/NyLZMGhcrp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 29, 2024
दिल्लीने सहा गडी राखून मिळवला विजय
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीने सहा गडी राखून विजय मिळवला. मणिपूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 गडी बाद 120 धावा केल्या, हर्ष त्यागी आणि दिग्वेश राठी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. यश धुलच्या (51 चेंडूत 59 धावा) अर्धशतकाच्या बळावर दिल्ली संघाने 18.3 षटकांत लक्ष्य गाठले. (हे देखील वाचा: IND vs AUS 2nd Test 2024: ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मिळाली आनंदाची बातमी, स्टार खेळाडू मैदानात परतण्यासाठी सज्ज!)
दिल्लीच्या सर्व 11 खेळाडूंनी केली गोलंदाजी
तीन षटके - हर्ष त्यागी, दिग्वेश सिंग, मयंक रावत
दोन षटके - आयुष सिंग, अखिल चौधरी, आयुष बडोनी
एक ओव्हर - प्रियांश आर्य, आर्यन राणा, हिम्मत सिंग, यश धुल, अनुज रावत
यापूर्वी, डेक्कन चार्जर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) सह अनेक संघांनी टी-20 सामन्यात नऊ गोलंदाजांचा वापर केला होता, परंतु एका संघाने सर्व खेळाडूंचा गोलंदाज म्हणून वापर करण्याची ही पहिलीच वेळ होती. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत आतापर्यंत चारही सामने जिंकून दिल्ली संघ क गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.