DC vs SRH, IPL 2024 Head to Head: अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली-हैदराबाद आमनेसामने, जाणून घ्या आकडेवारीत कोण आहे वरचढ
SRH vs DC (Photo Credit - X)

DC vs SRH, IPL 2024 35th Match: आयपीएल 2024 चा 35 वा (IPL 2024) सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (DC vs SRH) यांच्यात अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली येथे होणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ 20 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजता एकमेकांविरुद्ध खेळतील. सनरायझर्स हैदराबाद सध्या 6 सामन्यांतून चार विजय आणि 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स 7 सामन्यांत तीन विजय आणि 6 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.

दोन्ही संघांची हेड टू हेड आकडेवारी

आयपीएलमध्ये आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमनेसामने आले आहेत. दरम्यान, दिल्लीने 11 सामने जिंकले आहेत, तर हैदराबादने 12 सामन्यात दिल्लीला पराभवाची चव चाखली आहे. याशिवाय हैदराबादने दिल्लीविरुद्ध 219 धावांची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. तर, दिल्लीने ने हैदराबादविरुद्ध सर्वाधिक 207 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: DC vs SRB, IPL 2024 35th Match Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यांत आज होणार लढत, येथे पाहू शकता लाइव्ह सामना)

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर/सुमित कुमार, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकीपर), अक्षर पटेल, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

सनरायझर्स हैदराबादः ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.