Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
6 minutes ago

South Africa vs India T20 Stats: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक टी-20 सामन्याला थोड्याच वेळात होणार सुरुवात, जाणून घ्या कधी अन् कुठे तुम्ही पाहणार विनामूल्य सामना

दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

क्रिकेट Nitin Kurhe | Nov 15, 2024 07:08 PM IST
A+
A-
IND vs SA (Photo Credit - X)

South Africa National Cricket Team vs India National Cricket Team, 4th T20I Match: दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ चार सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आज (IND vs SA 4th T20I) म्हणजेच 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना जोहान्सबर्ग येथील वाँडरर्स स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता होणार आहे. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेची कमान एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. तर टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

कुठे पाहणार सामना?

Viacom18 नेटवर्ककडे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेचे प्रसारण हक्क आहेत. जे त्याच्या अधिकृत OTT प्लॅटफॉर्म JioCinema ॲपवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या T20 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग करेल. जिथे चाहते त्यांच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा अन्य डिव्हाइसवर कुठूनही सामन्याचा आनंद घेऊ शकतात. (हे देखील वाचा: IND vs SA 4th T20I Pitch Report: आजच्या सामन्यात कोणाचे असणार वर्चस्व फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

पाहा दोन्ही संघाचे खेळाडू

भारतीय संघ : संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, आवेश खान, जितेश शर्मा, विजयकुमार वैश्य, यश दयाल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, गेराल्ड कोएत्झी, अँडिले सिमेलेन, केशव महाराज, लुथो सिपामाला, नाकाबायोमझी पीटर, पॅट्रिक क्रुगर, मिहलाली मापनोवांग फेरनोवांग, ओटनीएल बार्टमन.


Show Full Article Share Now