DC vs SRH, IPL Qualifier 2: दिल्ली कॅपिटल्सचा टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय, दिल्लीने पृथ्वी शॉला दिला डच्चू, असा आहे दोन्ही संघांचा Playing XI
डेविड वॉर्नर आणि शिखर धवन(Photo Credit: PTI)

DC vs SRH, IPL Qualifier 2: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि  सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आमने-सामने येणार आहेत. दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आजचा सामना अबू धाबी (Abu Dhabi) येथे खेळला जाईल. आजच्या सामन्यातून फायनलमध्ये पोहचण्याची दोन्ही संघांसाठी अंतिम संधी असेल. आजच्या 'करो या मरो'च्या सामन्यात दिल्ली कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेता. आजच्या सामन्यातील विजयी संघाचा 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या फायनलमध्ये मुंबई इंडियन्सशी होईल. दिल्ली यापूर्वी पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाली असल्याने त्यांना आज दुसरी आणि अंतिम संधी मिळाली आहे, तर हैदराबादने मागील चार सामने जिंकले आहेत. त्यांनी एलिमिनेटर सामन्यात आरसीबीवर वर्चस्व गाजवत विजय मिळवला होता. (IPL 2020 Qualifier 2 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर-2 लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

दिल्लीला मागील 6 पैकी 5 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे, तर हैदराबादने सलग चार सामने जिंकले असून संघ प्रभावी फॉर्ममध्ये आहे. आजच्या सामन्यासाठी दिल्लीने दोन बदल केले असून हैदराबादच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल झालेला नाही. दिल्लीने आजच्या सामन्यासाठी पृथ्वी शॉ याला डच्चू दिला असून त्याच्या जागी प्रवीण दुबे आणि डॅनिअल सॅम्सच्या शिमरॉन हेटमायरचा समावेश केला आहे. पृथ्वी शॉचे मागील काही सामन्यात काही प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे ज्यामुळे त्याला दिल्ली प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले आहेत.

पाह डीसी आणि एसआरएच प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स: शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर (कॅप्टन), रिषभ पंत, मार्कस स्टोइनिस, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, प्रवीण दुबे, आर अश्विन, कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजे.

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वार्नर (कॅप्टन), श्रीवत्स गोस्वामी, मनीष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शबज नदीम, टी नटराजन आणि संदीप शर्मा.