DC vs SRH, IPL 2020 Qualifier 2 Live Streaming: दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील क्वालिफायर-2 लाईव्ह सामना व स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

IPL 2020 Qualifier 2 Live Streaming: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या दुसर्‍या क्वालिफायरमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात सामना होणार आहे. आणि धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडीयमवर हा सामना खेळला जाईल. हा सामना जिंकणारा संघ मंगळवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध (एमआय) अंतिम सामन्यात खेळेल. या स्पर्धेत दोन्ही संघ दोनदा आमने-सामने आले ज्यात हैदराबादने दोन्ही सामने जिंकले. हैदराबाद आणि दिल्ली यांच्यातील आजचा सामना भारतीय वेळेनुसार, आज 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अ‍ॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2021 कधी आणि कुठे होणार? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला मोठा अपडेट)

13 व्या हंगामाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याची दोन्ही संघांकडे ही शेवटची संधी असेल. दिल्लीने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा पराभव करत प्ले ऑफ गाठले होते, पण पहिल्या क्वालिफायरमध्ये त्यांना पुन्हा एकदा मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता दुसरीकडे, हैदराबादने सलग चार सामन्यात विजय मिळवून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवलं आहे. दोन्ही संघ अंतिम फेरी गाठण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील आणि एक रोमांचक सामना पहायला मिळेल हे निश्चित आहे.

पाहा दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ

दिल्ली कॅपिटल्स: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, किरोन पोलार्ड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, सौरव तिवारी, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, क्रिस लिन, मिशेल मॅकक्लेनाघन, नॅथन कोल्टर-नाईल, जयंत यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकूल रॉय, मोहसिन खान, शेरफेन रदरफोर्ड, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय.

सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, रिद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थंपी.