IPL 2021 कधी आणि कुठे होणार? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला मोठा अपडेट
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: IANS)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 चा 13वा सत्र अखेर अंतिम टप्प्यावर आलं आहे. या विश्व-स्तरीय टी-20 क्रिकेट लीगमध्ये आता फक्त दोन सामने शिल्लक आहेत, पण सर्वना पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलची (IPL) देखील उत्सुकता लागून राहिली आहे. यंदा कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे स्पर्धे युएई येथे पूर्वनिर्धारित वेळेपासून 6 महिन्यांपर्यंत उशीर झाले. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक महामारीच्या प्रतिबंधामुळे ही स्पर्धा भारताऐवजी युएई येथे आयोजित केली गेली जिथे खेळाडू बायो सिक्युर बबलमध्ये राहून हा खेळले. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपरकिंग्जच्या (सीएसके) 13 सदस्यांना हंगाम सुरु होण्यापूर्वी कोरोनाची लागण झाली असली तरी सर्वकाही सुरळीत पार पडले. आता आयपीएलच्या पुढील हंगामाची (आयपीएल 2021) चर्चाही सुरू झाली आहे आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी मोठा अपडेट दिला आहे. गांगुली म्हणाले की, आयपीएलचा पुढील हंगाम त्याच्या एप्रिल आणि मे महिन्यात त्याच्या स्वाभाविक काळात होणार आहे. (India Tour of Australia 2020-21: टीम इंडिया कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अंतिम दोन टेस्ट सामन्यांना मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण)

यासह माजी भारतीय कर्णधाराने हे देखील स्पष्ट केले की पुढील वर्षी आयपीएल परदेशात नसून फक्त भारतात आयोजित केले जाईल. गांगुली यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. आयपीएलच्या पुढच्या सीझनवरील प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "हो, अगदी. आमच्याकडे एप्रिल, मे महिन्यात आणखी एक (आयपीएल 2021 सीझन) असेल. युएई फक्त आयपीएलसाठी होते. आम्ही इंग्लंडचे भारतात आयोजन करणार आहोत." यासह भारतीय क्रिकेटचा पुढील सत्रात आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा समावेश असेल हे देखील त्यांनी स्पष्ट केले. "आम्ही भारतात घरगुती क्रिकेट आयोजित करू. रणजी ट्रॉफी, आम्ही बायो बबल तयार करु आणि खेळू."

दरम्यान, युएईमध्ये सध्या सुरु असलेल्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने यापूर्वीच फायनल गाठले असून, त्यांचा 10 नोव्हेंबर रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील दुसऱ्या क्वालिफायर विजेत्यांशी जेतेपदासाठी सामना होईल. आयपीएलचा अंतिम सामना दुबई येथे खेळला जाईल.