केन विल्यमसन (Photo Credit: PTI)

DC vs SRH IPL 2021 Match 20: सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सच्यामध्ये आयपीएलचा 20वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर नुकताच समपुष्टात आला. सामन्यात दिल्लीने दिलेल्या 160 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादने केन विल्यमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर धावसंख्याची बरोबरी केली त्यानंतर सुपर ओव्हर खेळवली गेली. यामध्ये सनरायझर्सने 8 धावांचे लक्ष्य दिले ज्याच्या प्रत्युत्तरात अखेर दिल्लीने बाजी मारली. विल्यमसन 66 धावा करून नाबाद परतला. याशिवाय, जॉनी बेयरस्टोने 38 धावांचे योगदान दिले. कर्णधार डेविड वॉर्नर आजच्या सामन्यात देखील फ्लॉप ठरला आणि अवघ्या 6 धावाच करू शकला. जगदीशा सूचितने विल्यमसन सोबत अखेरच्या ओव्हरमध्ये संघाला दिल्लीच्या धावसंख्येची बरोबरी करण्यात महत्वाची भूमिका बजावली. सूचितने नाबाद 14 धावा केल्या. दिल्लीकडून आवेश खानने 3 विकेट्स घेतल्या तर अक्षर पटेलने 2 आणि अमित मिश्राला 1 विकेट काढली. (SRH vs DC IPL 2021 Match 20: Prithvi Shaw याची अर्धशतकी खेळी, दिल्लीचे सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 160 धावांच आव्हान)

दिल्लीने दिलेल्या आव्हानात्मक धावसंख्येचा लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादसाठी वॉर्नर आणि बेयरस्टोची सलामी जोडी मैदानात उतरली. आयपीएलच्या घातक सलामी जोडीपैकी एक वॉर्नर-बेयरस्टोकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती, पण कर्णधार वॉर्नर अधिक काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात वॉर्नर 6 धावनावर रनआऊट होऊन तंबूत परतला. यांनतर फटकेबाजी करत असलेला बेयरस्टो देखील चुकीचा फटका खेळत कॅच आऊट झाला. बेयरस्टोने 18 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 38 धावांची खेळी केली. विराट सिंहच्या रूपात हैदराबादला तिसरा धक्का बसला. हैदराबादकडून पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेला केदार जाधव देखील प्रभावी खेळ करू शकला नाही. विकेटकीपर रिषभ पंतने मिश्राच्या गोलंदाजीवर जाधवला स्टंप आऊट केलं.

यापूर्वी टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉने 53 धावा केल्या, तर कर्णधार रिषभ पंतने 37 धावांची खेळी केली. हैदराबादकडून सिद्दार्थ कौलने 2 विकेट्स घेतल्या.