DC vs SRH, IPL 2020 Qualifier 2: दिल्लीने रोखला सनरायझर्सचा विजयी रथ! क्वालिफायर 2 मध्ये 17 धावांनी विजय मिळवत पहिल्यांदा फायनलमध्ये मारली धडक
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आयपीएल क्वालिफायर 2 (Photo Credit: PTI)

IPL 2020 Qualifiers: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunrisers Hyderabad) 17 धावांनी विजय मिळवून पहिल्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले. दिल्लीने पहिले फलंदाजी करून 189 धावांचा मोठा डोंगर उभारला आणि आणि सनरायझर्सला विजयासाठी 190 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादकडून आजच्या सामन्यात केन विल्यमसनने एकाकी लढा दिला आणि सर्वाधिक 67 धावा केल्या. विल्यमसनने संघाला विजयाच्या जवळ नेले, पण (Kane Williamson) विजयी रेषा ओलांडून देण्यात अपयशी ठरला. विल्यमसनएवजी अब्दुल समदने 33, मनीष पांडेने 21 आणि प्रियम गर्गने 17 धावा केल्या. हैदराबादचा पराभव करत दिल्लीने त्यांचा सलग चार सामन्यांचा विजयी रथ रोखला. दिल्लीसाठी कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) सार्वधिक 4 तर मार्कस स्टोइनिसने 3 विकेट घेतल्या आणि अक्षर पटेलला 1 विकेट मिळाली. (DC vs SRH, IPL 2020 Qualifier 2: दिल्ली कॅपिटल्सचे सनरायसर्स हैदराबादला 190 धावांचं विशाल आव्हान, शिखर धवनची तुफान फलंदाजी)

दिल्लीने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना यंदा सनरायझर्सकडूनही नवीन सलामी जोडी मैदानावर उतरली. कर्णधार डेविड वॉर्नरसह प्रियम गर्ग सलामीला आला. सनरायझर्सची सुरुवात खराब झाली. रबाडाने ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार वॉर्नरला अवघ्या 2 धावांवर माघारी धाडलं. त्यानंतर गर्ग आणि मनीष पांडे यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण, स्टोइनिसने गर्गला 17 धावांवर क्लीन बोल्ड केलं आणि नंतर त्याच ओव्हरमध्ये पांडेला बाद करूनकरत हैदराबादला दुहेरी झटका दिला. आधी प्रियम, तर शेवटच्या चेंडूवर मनिषला 21 धावांवर झेलबाद केलं. दिल्लीच्या गोलंदाजांपुढे होल्डर आणि विल्यमसन आश्वासक खेळी केली, पण मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात 11 धावांवर बाद झाला. स्टोइनिसच्या गोलंदाजीवर षटकार खेचत विल्यमसनने संघाला शंभरी पार करून दिली. युवा अब्दुल समदच्या साथीने महत्वपूर्ण भागीदारी करत विल्यमसनने दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पण स्टोइनिसने विल्यमसनला रबाडाकडे कॅच आऊट करत हैदराबादच्या आशा संपुष्टात आणल्या. विल्यमसनने 67 धावा केल्या. राशिद खान आणि अब्दुल समद यांनी संघाला विजयाच्या जवळ नेले, दोघे फलंदाज मोक्याच्या क्षणी माघारी परतले. समदने 33 तर राशिदने 11 धावा केल्या.

हैदराबादविरुद्ध विजयानंतर दिल्लीने पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली. आणि आता विजेते पदासाठी त्यांचा सामना चार वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होईल. आयपीएल ट्रॉफीसाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यातील सामना मंगळवार, 10 नोव्हेंबर रोजी दुबई येथे खेळला जाईल. मुंबई इंडियन्स गुणतालिकेत पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहेत.