रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स (Photo Credit: File Image)

आयपीएल 2021 मधील (IPL 2021) 22व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी (Delhi Capitals Vs Royal Challengers Bangalore) भिडणार आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी मैदानात (Narendra Modi Stadium) हा सामना आज (27 एप्रिल) सायंकाळी 7.30 वाजता खेळण्यात येणार आहे. या सामन्यात ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे दिल्लीने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादला धुळ चारली होती. तर, तर, दुसरीकडे बेंगलोरच्या संघाला संघाला चेन्नईविरुद्ध सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे देखील वाचा- BTS of Rahul Dravid's Viral Video: राहुल द्रविडने सिग्नलवर वाहनांची केली तोडफोड? 'द वॉल'ची जाहिरात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

ट्विट-

संघ-

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पद्धिकल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल सॅम, काईल जेमीसन, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज

दिल्ली कॅपिटलस: पृथ्वी शॉ, शिखर धवन, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टीरक्षक), स्टीव्ह स्मिथ, शिमरॉन हेटमीयर, मार्कस स्टॉयनिस, अ‍क्षर पटेल, अमित मिश्रा, कगिसो रबाडा, इशांत शर्मा, अवेश खान