
DC vs GT, IPL 2024: आयपीएल 2024 चा 40 वा (IPL 2024) सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर संध्यांकाळी 7.30 वाजता होणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव झाला होता. आता गुजरात टायटन्सविरुद्ध दिल्ली संघाला बॅट आणि बॉल या दोन्ही बाजूंनी चांगला खेळ करावा लागणार आहे. दिल्लीच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना विजयाची घोडदौड कायम राखावी लागेल. दुसरीकडे, गुजरात टायटन्स संघाने 8 सामने खेळताना 4 सामने जिंकण्यात यश मिळवले आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टायटन्सच्या कामगिरीत सातत्याचाही अभाव दिसून आला आहे, पण संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
दिल्ली विरुद्ध गुजरात हेड टू हेड आकडेवारी
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात फक्त चार वेळा सामना झाला आहे. गुजरातने यापैकी दोन सामने जिंकले असून दिल्ली कॅपिटल्सने तेवढेच सामने जिंकले आहेत. या मोसमातही या दोघांमध्ये एक सामना झाला होता, जो दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट्सने जिंकला होता. (हे देखील वाचा: DC vs GT, IPL 2024 Pitch Report: अरुण जेटली स्टेडियममध्ये कोणाल मिळणार मदत, फलंदाज की गोलंदाज? जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)
अशी असू शकते दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-11
दिल्ली कॅपिटल्स: पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेझर मॅकगर्क, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, इशांत शर्मा, खलील अहमद, मुकेश कुमार.
गुजरात टायटन्स : ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहरुख खान, राहुल तवेटा, रशीद खान, आर साई किशोर, नूर अहमद, मोहित शर्मा.