कगिसो रबाडा (Photo Credits: File Image)

Fastest to 50 Wickets in IPL: दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा (Kagiso Rabad) आयपीएल (IPL) 2020 मध्ये शानदार कामगिरी करत संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून काम करत आहे. रबाडाची कामगिरी सातत्याने चांगली राहिली असून सीएसकेविरुद्ध (CSK) या लीगच्या 34व्या सामन्यातही त्याने जबरदस्त गोलंदाजी केली. आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्याने आयपीएलमध्ये इतिहास रचला. रबाडाने जसे शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) हाती सीएसकेचा फलंदाज फाफ डु प्लेसिसला (Faf du Plessis) झेलबाद करताच लीगमधील सर्वात कमी सामन्यात 50 बळी घेणारा गोलंदाज ठरला. हा तर होता त्याचा पहिला विक्रम आणि त्याचा दुसरा विक्रम असा की तो या लीगमधील सर्वात कमी चेंडूंवर 50 विकेट घेणारा पहिला गोलंदाज देखील ठरला. म्हणजेच, आयपीएलमधील सर्वात कमी सामन्यांमध्ये आणि काही मोजक्या चेंडूंमध्ये सर्वात वेगवान 50 विकेट घेणारा रबाडा पहिला गोलंदाज ठरला. (DC vs CSK, IPL 2020: फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक, रायुडू, जडेजाची फटकेबाजी; सीएसकेचे DC समोर 180 धावांचे लक्ष्य)

आयपीएलमधील सर्वात कमी सामन्यांमध्ये त्याने 50 विकेट घेणाच्या बाबतीत कोलकाता नाईट रायडर्सच्या सुनील नारायणला मागे टाकले. नारायणने या लीगमधील 32 सामन्यात ही कामगिरी केली होती आणि तो प्रथम स्थानावर होता, पण आता रबाडाने त्याला मागे टाकत 27 सामन्यांत 50 गडी बाद केले आहेत. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने 33 सामन्यात विकेटचे अर्धशतक पूर्ण केले असून तो तिसर्‍या स्थानी आहे. दुसरीकडे, रबाडाने आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूत 50 विकेट घेण्याच्या बाबतीत मलिंगाला मागे टाकले. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजीने 616 चेंडूत तर मलिंगाने 749 चेंडूत हा पराक्रम केला होता. सुनील नारायण 760 चेंडूंसह यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.

आजच्या सामन्यात टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत सीएसकेने फाफ डु प्लेसिसचे अर्धशतक, डेथ ओव्हरमध्ये अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांच्या फटकेबाजीच्या जोरावर 179 धावांपर्यंत मजल मारली. डु प्लेसिसने सर्वाधिक 58 धावा केल्या, तर रायुडू नाबाद 45 आणि जडेजा नाबाद 33 धावा करून परतले. आजच्या सामन्यासाठी सीएसकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला. पियुष चावलाच्या जागी सीएसकेने केदार जाधवला आजच्या सामन्यासाठी संधी दिली. दुसरीकडे, डीसी टीम आज कोणत्याही बदलाशिवाय मैदानावर उतरली आहे.