तेलगू गाण्यांवर आपला जलवा दाखवल्यावर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू डेविड वॉर्नर (David Warner) आणि त्याचे कुटुंब आता पंजाबी गाण्यावर नाचताना दिसले. कोरोना व्हायरस आणि जगभरातील बहुतांश देशांमध्ये लॉकडाउन असल्याने क्रिकेटसह सर्व अनेक क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. क्रिकेटपटूंना लॉकडाउनमुळे घरातच कैद होऊन राहावे लागत आहे. अशा स्थितीत खेळाडू सोशल मीडियावर अधिक सक्रिय झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामी फलंदाज वॉर्नर एका वेगळ्याच मार्गाने चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. वॉर्नरने लॉकडाउनमध्ये टिकटॉक (TikTok) वर डेब्यू केले. मागील अनेक दिवसांपासून वॉर्नर टिकटॉकवरील आपले व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत आहे. मंगळवारीही वॉर्नरने एक टिकटोक व्हिडिओ पोस्ट केला ज्यामध्ये तो गुरू रंधावांनी गायलेल्या लोकप्रिय पंजाबी क्रमांकावर 'स्लोली स्लोली' (Slowly Slowly), या पंजाबी गाण्यावर पत्नी कँडी आणि दोन मुलींसह थिरकताना दिसत आहे. (डेविड वॉर्नर याच्या टिकटॉक व्हिडिओने 'Pokiri' चे दिग्दर्शक प्रभावित, चित्रपटात कॅमिओची दिली ऑफर )
“हो आम्ही आता पूर्णपणे गमावले. गडद रात्रीत चमकत रहा,” वॉर्नरने पोस्टला कॅप्शन दिले.कोविड-19 मुळे लॉकडाउन असल्याने वॉर्नर आपला अधिकाधिक वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. पाहा हा मजेदार व्हिडिओ:
View this post on Instagram
Yes we have lost it now 😂😂. Glow in the dark night. #family #fun #love #slowly @candywarner1
गेल्या आठवड्यात वॉर्नर आणि त्याची पत्नी 90 च्या दशकातील सुपरहिट बॉलिवूड गाणे 'मुकाबला'च्या हुक स्टेप्सवर थिरकले. शिल्पा शेट्टी कुंद्राला त्याच्या पोस्टवर टॅग करत वॉर्नरने चाहत्यांना, त्याच्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्यात कोण चांगले डान्स करू शकते हे ठरविण्यास सांगितले. यापूर्वी वॉर्नर आणि त्याच्या कुटुंबीयांनी अला वैकुंठपुरमलोच्या 'रामुलु रामुला' और 'बुट्टा बोम्मा' गाण्यावर डांन्स केला. वॉर्नरची लॉकडाउनमधील ही नवीन स्टाईल पाहून चाहत्यांनाहीहंसु अनावर झाले.