South Africa चा वेगवान गोलंदाज Dale Steyn याची टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती, करिअरच्या दृष्टीने मोठा निर्णय
Dale Styen (Photo Credits: BCCI Twitter)

दक्षिण आफ्रिकेचा (South Africa)  वेगवान गोलंदाज डेल स्टेन ( Dale Steyn ) याने आज वयाच्या 36 व्या वर्षी टेस्ट क्रिकेट (test Cricket) फॉरमॅट मधून कायमची निवृत्ती (Retirement) घेत असल्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलत असताना स्टेन याने आपण केवळ टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळॆ येत्या कलातही स्टेन दक्षिणम आफ्रिका संघाचे वन डे इंटरनॅशनल व टी- 20 सामन्यात खेळताना पाहायला मिळणार आहे. स्टेन हा आजवरच्या सर्वात यशस्वी गोलंदाजापैकी एक आहे त्याने आजवर त्याने अवघ्या 93 टेस्ट मॅचेस मध्ये 493 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र त्याच्या या निवृत्तीच्या घोषणेने 15 वर्षांचे टेस्ट क्रिकेटमधील करिअर संपुष्टात आले आहे.

पहा ट्विट

 

स्टेन याने आपल्या निवृत्तीची घोषणा करते वेळी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेनुसार आपण आपल्या सर्वात आवडीच्या खेळाच्या फॉर्म मधून निवृत्त होत आहोत याचे दुःख व्यक्त केले.टेस्ट क्रिकेट हा क्रिकेटचा गाभा आहे, ह्यात तुमची शारीरिक, मानसिक, भावनिक , सर्वच पातळीवर परीक्षा घेतली जाते. त्यामुळे पुन्हा टेस्ट मॅच न खेळणे हा माझ्यासाठी खूप मोठा व दुःखद निर्णय असल्याचीही स्टेन याने म्हंटले आहे. असं असला तरीही, आपण केवळ टेस्ट मधून वेगळे होत आहोत आणि आपले लक्ष वन दे आणि टी- २० मध्ये केंद्रित करणार आहोत अशी त्याने स्पष्ट केले . यामुळे कौशल्याचे कसाब दाखवण्याची संधी मिळून स्वतःला यशस्वी बघता यावे अशी इच्छा स्टेनने बोलून दाखवली.

दरम्यान, स्टेन हा दक्षिण आफ्रिकेतील यशस्वी गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने २००४ मध्ये इंग्लंड विरोधी सामन्यातून टेस्ट क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते. आणि पहिल्याच सामन्यात इंग्लंडचा कॅप्टन Michael Vaughan याची विकेट घेऊन त्याने सर्वाना आपली दाखल घ्यायला भाग पडले होते.