CSK vs RCB IPL 2021 Match 19: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 19व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आमने-सामने येणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ‘विराटसेना’ आणि ‘धोनीब्रिगेड’मध्ये आजचा सामना रंगणार आहे. आजच्या सामन्यात सीएसके कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही टेबल टॉपर संघाने आजच्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कधी बदल केले आहेत. चेन्नईने मोईन (Moeen Ali) अली आणि लुंगी एनगीडी यांना बाहेर केले असून त्यांच्या जागी ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) व इमरान ताहीर यांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे ताहीरचा यंदाच्या आयपीएलमधील हा पहिला सामना असणार आहे. दुसरीकडे, आरसीबीने केन रिचर्डसन आणि शाहबाझ अहमदच्या जागी डॅनियल ख्रिश्चन व नवदीप सैनीचा समावेश केला आहे. (MS Dhoni vs Virat Kohli IPL 2021: एमएस धोनी की विराट कोहली, कोण आहे सर्वोत्तम मॅच-विनर? पहा काय सांगतात स्टॅट्स)
दरम्यान, आयपीएल 2021 मध्ये ‘विराटसेने’ने सर्व चार सामने जिंकून आपला विजयरथ कायम ठेवला आहे. त्यामुळे, आज धोनीब्रिगेड आरसीबीचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होते की नाही याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असेल. दुसरीकडे, चेन्नईने एकूण चार सामने खेळले ज्यापैकी तीन सामन्यात विजय तर एका सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं. चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिला सामना गमवल्यानंतर पुढील तीन सामन्यात चांगलंच कमबॅक करत पंजाब, राजस्थान आणि कोलकाता संघावर मात केली आहे. अशास्थितीत धोनीचे सुपर किंग्स विराटच्या रॉयल चॅलेंजर्सवर पडणार की हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सीएसके प्लेइंग इलेव्हन: एमएस धोनी (कॅप्टन/विकेटकीपर), रुतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो, सॅम कुरन, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर आणि इमरान ताहीर.
आरसीबी प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), देवदत्त पदिक्काल, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, डॅनियल ख्रिश्चन, काईल जेमीसन, हर्षल पटेल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज आणि युजवेंद्र चहल.