आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 25व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळरू (CSK Vs RCB) आज एकमेकांशी भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळरू संघाचे कर्णधार पद भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
चेन्नई आणि बंगळरूच्या संघाला या हंगामात चांगले प्रदर्शन करता आले नाही. चेन्नई आणि बंगळरू या दोन्ही संघाला आपपल्या मागील सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता. चेन्नईच्या संघाने या हंगामात 6 सामने खेळले असून केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बंळरूच्या संघाने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवाला आहे. यामुळे आजचा सामना चेन्नईच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. हे देखील वाचा- KXIP vs KKR, IPL 2020: दिनेश कार्तिकने जिंकला टॉस, केकेआर करणार पहिले फलंदाजी
संघ-
चेन्नई सुपर किंग्ज:
शेन वॉटसन, फाफ डू प्लेसिस, अंबाती रायडू, केदार जाधव, एमएस धोनी ( कर्णधार,यष्टीरक्षक), सॅम कुरन, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरः
ऍरोन फिंच, देवदत्त पद्धिकल, विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स (यष्टीरक्षक), ख्रिस मॉरिस, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, इसरू उदान