CSK vs MI, IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाचा आजचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर
Chennai Super Kings vs Mumbai Indians (Photo Credits-File Image)

CSK vs MI: आज (26 एप्रिल) आयपीएलचा (IPL) सामना चेन्नई (Chennai) येथील एम. ए. चिदंबरम स्टेडिअमवर (M. A. Chidambaram Stadium) चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाचा (MI) सामना खेळवला जाणार आहे. तर चेन्नईच्या संघाने आतापर्यंत 11 सामन्यामधील एकूण 8 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच 16 अंक मिळवत प्लॅऑपमध्ये जाण्यासाठी तयार झाली आहे. कर्धणार महेंद्र सिंग धोनी आपला विक्रम सुरु ठेवण्यासाठी उत्तम खेळी करताना दिसून येत आहे.आजचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर पाहता येणार आहे.

तर मुंबई संघ 12 अंकांसह तिसऱ्या स्थानकावर आहे. कर्णधार रोहित शर्मा असलेला मुंबईच्या संघाला पहिल्या चरणात चेन्नई विरुद्ध सामना जिंकत 37 धावांनी विजय मिळवला होता. तसेच दोन्ही संघाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांच्यामध्ये 27 सामने खेळवण्यात आले आहेत. तर मुंबई संघाने 15 सामन्यात विजय मिळवला असून चेन्नईच्या संघाला 12 सामन्यात विजय मिळवता आला आहे.

कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघाचा सामाना टीव्हीप्रमाणे ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर या सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

संभावित खेळाडूंचा संघ-

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, युवराज सिंह, क्रुणाल पांड्या, ईशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, मयंक मारकंडे, राहुल चाहर, अनूकुल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तारे, क्विंटन डी कॉक, एविन लुइस, केरन पोलार्ड, बेन कटिंग, मिशेल मैक्लेनघन, एडम मिल्ने, जेसन बेहरेनडॉर्फ, अनमोलप्रीत सिंह, बरिंदर सरन, पंकज जायसवाल, रसिख सलाम, जसप्रीत बुमराह.

चेन्नई सुपर किंग्स: अंबाती रायडू, शेन वाटसन, सुरेश रैना, महेंद्र सिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), केदार जाधव, रविंद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड़, मिशेल सैंटनर, डेविड विली, सैम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा.