किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: File Image)

KXIP vs CSK, IPL 2020 Live Streaming: आयपीएलच्या (IPL) रविवारी होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने-सामने येतील. दोन्ही टीमने 4 सामने खेळले असून तीनमध्ये त्यांचा पराभव झाला तर एका सामन्यात दोघांनी विजय मिळवला.दोन्ही टीममधील आजचा हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. सामन्याची सुरुवात भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता होईल. टॉस अर्धातास आधी म्हणजे 7:00 वाजता होईल. किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स 3 एचडी अशा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर लाईव्ह प्रसारित केला जाईल. शिवाय, सामन्याचे ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीम हॉटस्टारवर उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.

पंजाब आणि चेन्नई, दोंघांना मागील सामन्यात प्रभावाला सामोरे जावे लागले असल्याने आजच्या सामन्यात चेन्नई आणि पंजाब पराभवाची कोंडी फोडण्यासाठी मैदानात उतरतील. गुणतालिकेत पंजाब सातव्या तर चेन्नई आठव्या स्थानावर आहे. चेन्नईने अनेक वर्षानंतर पहिल्यांदा आयपीएलमध्ये सलग तीन सामने गमावले आहेत. पंजाबने देखील यापूर्वी सलग दोन सामने गमावले आहेत, त्यामुळे दोन्ही टीम आज विजय मिळवून आपली गाडी रुळावर आणण्याच्या निर्धारित असतील.

किंग्स इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्स संघ:

किंग्स इलेव्हन पंजाब संघ: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, शेल्डन कॉटरल, क्रिस गेल, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद शमी, मुजीब उर रहमान, करुण नायर, जेम्स नीशम, निकोलस पूरन, ईशान पोरेल, अर्शदीप सिंह, मुरुगन अश्विन, कृष्णाप्पा गौथम, हरप्रीत ब्रार, दीपक हूडा, क्रिस जॉर्डन, सरफराज खान, मनदीप सिंह, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, सिमरन सिंह (विकेटकीपर), जगदीशा सुचित, ताजिंदर सिंह, हार्डस विल्जॉईन

चेन्नई सुपर किंग्स संघ: एमएस धोनी (कॅप्टन), मुरली विजय, अंबाती रायुडू, फाफ डू प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चाहर, पियुष चावला, इमरान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, सॅम कुरन, एन जगदीसन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.