CSK vs KKR, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: File Image)

CSK vs KKR, IPL 2020 Live Streaming: प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आता इंडियन प्रीमियर लीगमधील (Indian Premier League) मधील उर्वरित संघांचे समीकरण खराब करण्याचा प्रयत्न करेल आणि यात त्यांचा पहिला शिकार विजयाच्या शोधात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) असतील. इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सत्रातील 49व्या सामन्यात सुपर किंग्जचा सामना आज नाइट रायडर्सशी होणार आहे. सीएसके (CSK) आणि केकेआर (KKR) यांच्यातील आजचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल, तर टॉस अर्धातास पूर्वी म्हणजे 7:00 वाजता होईल. भारतातील प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. शिवाय, या सामन्याचे लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग डिस्नी+ हॉटस्टार अ‍ॅपवर पाहण्यास उपलब्ध असेल. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020 Points Table Updated: RCB विरुद्ध विजयाने मुंबई इंडियन्स प्ले ऑफ पासून एक पाऊल दूर, पाहा लेटेस्ट पॉईंट्स टेबल)

केकेआरचे 12 सामन्यांमधून 12 गुण आहेत आणि प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांनी पुढील दोन सामने जिंकणे गरजेचे आहे. आठ संघांच्या टेबलमध्ये चेन्नई अंतिम क्रमांकावर असून त्यांची टीम आता प्रतिष्ठेसाठी मैदानात उतरेल. प्ले ऑफच्या मोक्याच्या क्षणी साखळी फेरीतील पराभवाने बर्‍याच संघांना 14 किंवा 16 गुण मिळू शकतात, अशा स्थितीत चांगल्या नेट रनरेटने प्ले ऑफची जागा निश्चित केली जाईल. हे लक्षात घेऊन केकेआरला मोठ्या फरकाने विजय मिळवणे महत्वाचे आहे.

पाहा सीएसके आणि केकेआर संघ

चेन्नई सुपर किंग्स: एमएस धोनी (कॅप्टन, विकेटकीपर), मुरली विजय, अंबाती रायडू, फाफ डु प्लेसिस, शेन वॉटसन, केदार जाधव, रवींद्र जडेजा, लुंगी एनगीडी, दीपक चाहर, पियुष चावला, इमरान ताहिर, मिशेल सॅटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकुर, सॅम कुरन, एन जगदीशन, केएम आसिफ, मोनू कुमार, आर साई किशोर, रुतुराज गायकवाड, कर्ण शर्मा.

कोलकाता नाईट रायडर्स: इयन मॉर्गन (कॅप्टन), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, प्रसिद्ध कृष्ण, संदीप वारियर, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, क्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, सुनील नारायण, निखिल नाइक, टॉम बंटन, टिम सेफर्ट.