CSK vs DC, IPL 2019: दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या विजयानंतर महेंद्रसिंग धोनी याने खास गिफ्ट देत चाहत्यांचे मानले आभार (Watch Video)
MS Dhoni of Chennai Super Kings. (Photo Credits: IANS)

IPL 2019: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या काल रंगलेल्या सामन्यात चेन्नई संघ विजय ठरला. या विजयानंतर संघाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. सामना संपल्यानंतर धोनीसह संघातील इतर क्रिकेटर्सनी सुपर थँक्स लिहिलेले टी-शर्ट घातले आणि प्रेक्षकांना गिफ्ट्स वाटू लागले.

विजयानंतर संपूर्ण स्टेडियमला फेरी मारत धोनीने हातात एक टेनिस रॅकेट घेतले आणि काही चेंडू प्रेक्षकांच्या दिशेने भिरकावले. यावेळी धोनीच्या हातून मिळणाऱ्या चेंडूचा झेल पकडण्यासाठी चाहते प्रयत्न करत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

पहा व्हिडिओ:

कालच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यामुळे फलंदाजीसाठी चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरली. चेन्नईने केवळ 4 विकेट्स गमावत 179 धावा केल्या. 180 धावांचे लक्ष्य गाठताना दिल्ली संघाची दमछाक झाली. चेन्नईने अवघ्या 99 धावात दिल्ली संघाच्या सर्व गडींना तंबूत धाडले आणि 80 धावांनी विजय प्राप्त केला. या विजयासह चेन्नईने स्पर्धेत पुन्हा एकदा अव्वल स्थान मिळवले आहे.