दिव्यांग बॅट्समनने अंतर्मनाने पाहिला चेंडू, ठोकला षटकार
(Archived, edited, symbolic images)

आग्रा (Agra City) येथील सेंट पीटर्स कॉलेजच्या (Saint Peters College) मैदानावर दिव्यांगांचा अनोखा क्रिकेट सामाना रविवारी (२ डिसेंबर) पाहायला मिळाला. सामन्यात मजा तर तेव्हा आली जेव्हा दिव्यांग (Divyang) बॅट्समनने केवळ आंतर्मनाची साद ऐकून चेंडू पाहिला आणि थेट षटकार ठोकला. मैदानावर खेळणाऱ्या दिव्यांग खेळाडूंकडे सर्वसामन्यांप्रमाणे दृष्टीचे वरदन नसले तरी, त्यांच्याकडे मनाची दृष्टी मात्र जबरदस्त असल्याचे पाहायला मिळाले. घुंगरू भरलेला चेंडूचे मैदानावर दिव्यांग खेळाडूंकडून एकमेकांकडे हस्तांतरण होत असताना येणारा आवाज भलेही उपस्थित प्रेक्षकांसाठी कदाचित एक संगीत असू शकेल. पण, या खेळाडूंसाठी तो एक संदेश होता. आवाजाच्या माध्यमातून मिळणारा हाच संदेश ओळखत दिव्यांग खेळाडूंनी क्रिकेट सामन्याचा आनंद घेतला. केवळ आनंदच घेतला नाही तर, त्यांनी थेट चौकार, षटकारही ठोकले आणि अचूक झेलही टीपले. टीम बीकडून खेळत असलेला खेळाडू दिनेशने टीम ए विरुद्ध पाच षटकांच्या सामन्यात ४२ धावांची खेळी केली. ज्यात ९ चौकारांचा समावेश आहे. दिनेशला सामनावीर म्हणून घोषीत करण्यात आले.

रिवाज संस्थेकडून दिव्यांगांसाठी क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, मुकबधीर (Spacial Children) आणि दिव्यांगांच्या स्पर्धांमध्ये मैदानावर खेळतान आवाज तर येत नव्हता. पण, खेळाडूंनी फटकावलेले चेंडू आणि त्यांनी एकमेकांशी साधलेला संवाद, त्यांची देहबोली उपस्थित प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडत होती. हे प्रेक्षक खेळाडूंना टाळ्याच्या गजरात प्रोत्साहीत करत होते. आग्रा आणि मथूरा यांच्यात झालेल्या या सामन्यात अगरा टीमने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेत दहा षटकांमध्ये ९० धावा केल्या. मथुराच्या खेळाडूंनीही दमदार कामगिरी केली. आग्रा टीम १४ धावांनी विजयी झाली. (हेही वाचा, India VS Australia Test Series: पृथ्वी शॉ ला दुखापत; कसोटी मालिकेपूर्वीच भारताला धक्का)

दरम्यान, समना पाहण्यासाठी आलेल्या क्रिकेटपटू दीपक चहरने दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि त्यांना काही टीप्सही दिल्या. आस्ट्रेलियासोबत सुरु होणाऱ्या टेस्ट सीरीजबाबत दीपकने सांगितले की, टी-20 मालिकेत आम्ही चांगले खेळलो. पावसामुळे सामना रद्द झाला नसतात तर आम्ही ही मालिका जिंकू शकत होतो. टेस्ट सीरीजमध्येही आम्ही चांगली कामगरी करु. या वेळी पूडन डॉवर, लोकेश चहर, रिवाज संस्थेचे अध्यक्ष मधू सक्सेना, सुनील यादव, केशव अग्रवाल, अंशिका सक्सेना आदी मंडळी उपस्थित होती.