पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter)

India VS Australia Test Series: सध्या भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दौर्‍यावर आहे. 6 डिसेंबरपासून कसोटी सामन्यांना (Test Series) सुरुवात होणार आहे. मात्र कसोटी मालिका सुरु होण्यापूर्वीच संघाला धक्का बसला आहे. भारताचा आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉ ला (Prithvi Shaw) दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

सिडनी (Sydney) मैदानावर क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेवनविरुद्ध (Cricket Australia XI) सुरु असलेल्या सराव सामन्याच्या (CAXI vs IND, 4-day Practice Match) तिसऱ्या दिवशी पृथ्वी शॉ ला दुखापत झाली.

झेल पकडताना त्याच्या डाव्या घोट्याला (left ankel)  दुखापत झाली आहे.  पृथ्वी शॉ ला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण आहे.

भारतीय क्रिकेट संघाला पृथ्वी शॉ कडून खूप अपेक्षा होत्या. गेल्या काही दिवसातील त्याच्या प्रदर्शनामुळे संघात विश्वास निर्माण झाला होता. मात्र शॉ चे येणाऱ्या स्कॅन रिपोर्ट्सनंतर तो कसोटी मालिकेत खेळू शकेल की नाही, हे कळेल. त्यामुळे अजूनही शॉ च्या परतण्याची संघाला आशा आहे.