क्रिकेट मॅच दरम्यान चाहते आगळ्या-वेगळ्या गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात, असाच एक प्रकार न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातील क्राइस्टचर्च (Christchurch) येथील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाला. सामना पाहायला आलेल्या एका चाहत्याने आपल्या पोस्टरद्वारे ऑस्ट्रेलियन फलंदाज जो बर्न्स (Joe Burns) आणि स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांना ट्रोल करत यूजर्सचे लक्ष वेधले. चाहतीने हातात एक पोस्टर धरले ज्यावर लिहीले होते की ‘क्रिकेट बॅट विक्रीला आहेत. खुप कमी वापरल्या आहेत. संपर्क क्रिकेट ऑस्ट्रेलिया येथे स्टिव्ह स्मिथ आणि जो बर्न्सला करावा.’ या पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे आणि यामागील कारणही तसं योग्यच आहे. न्यूझीलंड-पाकिस्तानसह सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात देखील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिका खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्यानंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत असून दोन्ही सामन्यात स्मिथ आणि बर्न्सला मोठी खेळी करता आलेली नाही. (IND vs AUS 3rd Test: टीम इंडियाविरुद्ध तिसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका, ‘हा’ गोलंदाज सिडनी कसोटीतून आऊट)
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधाराची अलीकडेच आयसीसीच्या दक्षकच कसोटी क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती, परंतु भारताविरुद्ध बॅटने त्याला संघर्ष करावा लागत असल्याने त्याला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले आहे. स्मिथने दोन्ही सामन्यात मिळून 10 धावा केल्या आहेत. बर्न्सने अॅडिलेडमधील सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद 51 तर मेलबर्नमधील पहिल्या डावात तो भोपळा देखील फोडू शकला नाही तर दुसऱ्या डावात तो 4 धावच करू शकला. स्मिथ आणि बर्न्सच्या खराब कामगिरीचा फटका आधीच बसला आहे. स्मिथला कसोटी क्रमवारीत आपला अव्वल क्रमांक गमवावा लागला असून तो तिसऱ्या स्थानी घसरला आहे, तर बर्न्सने ऑस्ट्रेलियन संघातील जागा गमवली आहे. बर्न्सला सिडनी येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातून वगळण्यात आले आहे. आणि यामुळे चाहत्याने ट्रोल करण्याची संधी गमावली नाही.
What did I just saw on #PAKvNZ 🙂#NZvPAK pic.twitter.com/ejPrdXXI0Z
— Saqib Shah (@Saqibca) January 3, 2021
दरम्यान, 7 जानेवारीपासून टीम इंडिया आणि कांगारू संघात तिसर्या कसोटीच्या अगोदर दोन्ही संघांत काही मोठ्या खेळाडूंचा समावेश झाला आहे. रोहित शर्मा आपला क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघात दाखल झाला तर डेविड वॉर्नर दुखापतीतून सावरल्यानंतर ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये परतला आहे. मात्र, रोहित आणि इतर चार भारतीय खेळाडूंनी बायो-बबल तोडल्याचे वृत्त समोर आल्यावर भारतीय ओपनरच्या खेळण्यावर शंका निर्माण केली जात आहे.