ट्रिनबागो नाइट रायडर्सने लगावला विजेतेपदाचा चौकार (Photo Credit: Twitter/CPL)

कॅरेबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) फायनल सामन्यात फ्रँचायझी त्रिनिबागो नाइट रायडर्सने (Trinbago Knight Riders) आपल्या 12 वा विजय मिळवत सीपीएलचे (CPL) चौथे विजेतेपद जिंकले. सेंट लुसिया झुक्सविरुद्ध (St Lucia Zouks) झालेल्या अंतिम सामन्यात नाइट रायडर्सने 155 धावांचे लक्ष्य गाठले आणि विजेतेपद आपल्या नावावर केले. टीकेआरचा मालक आणि बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानने  (Shah Rukh Khan) टीकेआरच्या सलग 12 वा विजय आणि टीमने जिंकलेल्या चौथ्या सीपीएल विजेतेपदासाठी अभिनंदन केले. डॅरेन ब्रावोने विजयी चौकार ठोकताच त्याचे चाहते आणि नाइट रायडर्स टीम सदस्यांच्या आनंदात भर घालतशाहरुखने उत्साहपूर्ण ट्विट केले. 'आयपीएलमध्ये ये,' असं शाहरुखने एका ट्विटमध्ये म्हटले. “आमी टीकेआर आम्ही राज्य करतो. अप्रतिम प्रदर्शन मुलांनो... आपण आम्हाला गर्वित, आनंदित करतात आणि प्रेक्षक नसतानाही उत्साह भारतात. लव्ह यू टीम. टीकेआर, लेंडल सिमन्स आणि माझा आवडता डीएम ब्रावो, चांगले केले कीरोन पोलार्ड आणि डीजे ब्रावो, लव्ह यू, आता किती 4!!! ब्रॅंडन मॅक्युलम आयपीएलमध्ये ये, लव्ह यू,” बादशाहने ट्विटमध्ये लिहिले. (CPL 2020: ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन डंकने पावसामुळे मैदानात जमलेल्या पाण्यात लगावली धाव, पाहून गोंधळलेल्या यूजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया Watch Video)

साम्याबद्दल बोलायचे तर, लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्रावो यांच्या नाबाद 138 धावांची भागीदारीच्या नाइट रायडर्सने 155 धावांचे लक्ष्य 1.5 ओव्हर आणि 8 विकेटने गाठले. सिमन्सने नाबाद 84 आणि डॅरेन ब्रावोने नाबाद 54 धावा केल्या. टीकेआरने अंतिम सामन्यात आपल्या ऐतिहासिक विजय मिळवला, त्यांनी एकही सामना न गमावता हंगामाचे विजेतेपद मिळवले. टीकेआरने यापूर्वी लीग स्टेजमध्ये 10 विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले होते. यापूर्वी, नाइट रायडर्सने झुक्सला 154 धावांवर ऑल-आऊट केले. कर्णधार कीरोन पोलार्डए 4 ओव्हरमध्ये 30 धावा देऊन 4 विकेट घेतल्या, तर फवाद अहमद आणि अली खान यांनी काही विकेट्स घेतल्या. झुक्सने प्रथम फलंदाजी करताना पॉवरप्ले ओव्हरमध्ये शानदार सुरूवात केली. आंद्रे फ्लेचर आणि मार्क डियाल यांनी 67 धावांची भागीदारी केली.

सीपीएल फायनल 

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे, जैव-सुरक्षित वातावरणात त्रिनिदाद आणि टोबॅगो या दोन ठिकाणी सीपीएल 2020 बंद दारा मागे आयोजित केले गेले होते. दुसरीकडे, सीपीएलनंतर आता खेळाडू आयपीएलसाठी युएईला रवाना होतील. पोलार्ड, ड्वेन ब्रावो यांच्या फॉर्मने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी दिलासादायक बाब आहे.