इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. परंतु फ्रँचायझींमध्ये कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) घटना समोर येण्याचे सत्र कायम आहे. तिसर्या फेरीच्या टेस्ट दरम्यान सहाय्यक कर्मचार्याचा सदस्य कोविड-19 (COVID-19) पॉसिटीव्ह आढल्याचे रविवारी दिल्ली कॅपिटल्सने सांगितले. “दिल्ली कॅपिटलचा (Delhi Capitals) सहाय्यक फिजिओथेरपिस्ट कोरोना व्हायरस पॉसिटीव्ह आढळला आहे. तो त्याच्या अनिवार्य क्वारंटाइन कालावधीतून जात होता आणि दुबईला (Dubai) आगमन होताना झालेल्या त्याच्या पहिल्या दोन टेस्टचा अहवाल नकारात्मक आला होता आणि तिसऱ्यामध्ये त्याचा कोरोना अहवाल सकारात्मक आला,” फ्रँचायजीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. दिलासादायक बाब म्हणजे सहायक फिजिओथेरपिस्ट कोणाच्याही संपर्कात आला नव्हता. (IPL 2020 Schedule: BCCI कडुन UAE मधील आयपीएल 13 चे वेळापत्रक जाहीर, तुमच्या आवडत्या टीम ची मॅच कधी होणार इथे पाहा)
निवेदनात पुढे म्हटले की, “त्याची अद्याप भेट झाली नव्हती आणि फ्रँचायझीच्या कोणत्याही खेळाडू किंवा कर्मचार्यांशी त्यांचा संपर्क झाला नव्हता. तो त्वरित आयसोलेट झाला होता आणि सध्या दुबईत आयपीएल आयसोलेशन फॅसिलिटीमध्ये येत्या 14 दिवसांसाठी राहील. त्यानंतर दोन कोविड-19 नेगेटिव्ह टेस्टनंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघात जाण्यासाठी पात्र ठरेल. फ्रेंचायझीची वैद्यकीय टीम त्याच्याशी सतत संपर्कात आहे आणि त्वरित बरे होण्यासाठी शुभेच्छा देते.” आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर झाल्यावर ही घटना समोर आली. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जच्या दोन गोलंदाजांसोबत अनेक सदस्य कोरोना पॉसिटीव्ह आढळले होते.
आयपीएलच्या नवीन वेळापत्रकानुसार सीएसके पहिला सामना 19 सप्टेंबर रोजी गेतजेता मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळले तर हंगामाच्या दुसर्या सामन्यात दिल्लीची कॅपिटल्सचा 20 सप्टेंबर रोजी किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना होईल. भारताचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा टीमचे नेतृत्व करेल. दिल्ली टीममध्ये अनुभव आणि जोश अशा अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. मागील हंगामात अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने प्ले-ऑफ फेरीत गाठली होती, मात्र ही टीम यंदा पुढे जाऊन विजयी होण्याच्या प्रत्यनात असेल.