युएई (UAE) मध्ये होणार्या ड्रीम 11 (Dream 11) इंडियन प्रीमियर लीग 2020 (IPL) चे वेळापत्रक बीसीसीआय कडुन जाहीर करण्यात आले आहे. 19 सप्टेंबर रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात पहिली मॅच होऊन यंंदाच्या या प्रलंबित आयपीएल हंगामाची सुरूवात होईल.यानंंतर दुबई (Dubai) मधील पहिला सामना रविवारी होणार असून दिल्ली (Delhi) व किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) व त्यानंतर सोमवारी तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात मॅच होणार आहेत. प्लेऑफची जागा आणि ड्रीम 11 आयपीएल 2020 ची अंतिम सामन्याच्या बाबत घोषणा नंंतर होणार आहे. यंंदाच्या आयपीएल 13 चे संपुर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
युएई मध्ये अबू धाबी (Abu Dhabi) , दुबई (Dubai) आणि शारजाह (Sharjah) अशा तीन ठिकाणी 56 दिवस होणाऱ्या स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. दर दिवशीचा पहिला सामना 3:30 वाजता आणि संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरु होणार आहेत. एकूण 24 सामने दुबई, 20 अबुधाबी आणि 12 शारजाह येथे होतील.
आयपीएल 2020 हे स्टार स्पोर्टस नेटवर्क च्या माध्यमातुन पाहायला मिळणार आहे.याशिवाय जर का तूम्हाला ऑनलाईन मॅचेस बघायच्या असतील तर त्या साठी Disney+ Hotstar.चा पर्याय सुद्धा आहे. आयपीएल संबधित सर्व अपडेट वेळच्या वेळी जाणुन घेण्यासाठी लेटेस्टली मराठीला सुद्धा जरुर फॉलो करा.