फुटबॉलर नेमार (Photo Credit: Getty)

जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारला (Neymar) कोरोना व्हायरसने (Coronavirus) पीडित कमी पगाराच्या ब्राझिलियन (Brazil) कामगारांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 120 अमेरीकी डॉलर, म्हणजे 9 हजार कल्याणकारी देयकास (Welfare Payment Scheme) मान्यता देण्यात आली आहे. जगभरात कोरोना ग्रस्तांची संख्या 67 लाखांच्या वर पोचली आहे तर धोकादायक व्हायरसमुळे 3 लाख 93 हजार लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्नांची नोंद झाली आहे. ब्राझीलमध्ये कोरोना ग्रस्तांची संख्या 6 लाख 19 हजारांच्या वर पोहचली आहे. त्यामुळे देशात लॉकडाउन (Lockdown) वाढवण्यात आला आहे या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेल्यांना बसला आहे, कारण आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत ब्राझील सरकारने त्यांना 9 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पण, यामध्ये क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत फुटबॉलर नेमारने देखील अर्ज केल्याचं उघडकीस आलं आहे. (Coronavirus: इंग्लिश प्रीमियर लीगच्या क्लबमधील आणखी चार जणांना कोरोनाची बाधा, संक्रमितांची संख्या 12 वर पोहचली)

नेमार, हा जगातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉलर आहे. वास्तविक प्रकरण म्हणजे, जन्मतारीख आणि ब्राझिलियन आयडी नंबरचा उपयोग करून फेडरल सरकारकडून 600-रिअल उत्तेजनाच्या पेमेंटसाठी नोंदणी करण्यासाठी केला गेला, अशी माहिती न्यूज साइट यूओएलने (UOL) दिली आहे. आपत्कालीन पेमेंट्स अनौपचारिक क्षेत्रात काम करणार्‍यांना, जसे की क्लीनर किंवा कुक यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये नेमारने इंस्टाग्राम पोस्टद्वारे तब्बल 11.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेमार तिसऱ्या स्थानावर आहे.

ब्राझील हा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होणार दुसरा, तर मृत्यूच्या बाबतीत अमेरिका आणि ब्रिटननंतर तिसरा सर्वात मोठा ग्रस्त देश आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे 1 लाख मृत्यू झेल,तर ब्रिटनमध्ये मृत्यूचा आकडा 39,904 इतका आहे. दुसरीकडे, ब्राझीलमध्ये आजवर 34 हजार लोकांना व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे.