जोस बटलर (Photo Credit: IANS)

इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने (Jos Buttler) मागील वर्षी झालेल्या 2019 वर्ल्ड कप फायनलमधील (World Cup Final) जर्सीच्या लिलावापासून कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढाईत मदत करण्यासाठी 65,000 पौंड (सुमारे 60 लाख रुपये) मिळवले आहे. गेल्या वर्षी लॉर्ड्स येथे न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) झालेल्या अंतिम सामन्यात बटलरने ही जर्सी घातली होती. लंडनमधील रॉयल ब्रॅम्प्टन आणि हर्टफिल्ड हॉस्पिटलसाठी त्यांनी निधी उभा केला आहे. वर्ल्ड कप सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद आणि याआधीच्या सामन्यात अर्धशतक ठोकणार्‍या बटलरने एका आठवड्यापूर्वी जर्सीला ईबेवर लिलावासाठी ठेवली होते. मंगळवारी जेव्हा त्याचा लिलाव बंद झाला तेव्हा त्याकरिता 82 बिड लावल्या गेल्या होत्या. विजेत्याने 65,100 पौंडच्या किंमतीत ही जर्सी खरेदी केली आहे. लिलावात मिळालेली रक्कम कोरोना व्हायरसची लागण झालेल्या लोकांवर उपचार करणार्‍या रूग्णालयांत आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी केली जाईल. (COVID-19: कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत पैसे जमविण्यासाठी जोस बटलर करतोय वर्ल्ड कप फायनलच्या जर्सीचा लिलाव)

इंग्लंडचा प्रसिद्धीत लॉर्ड्स मैदानावर खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात बटलरने सुपर ओव्हरमध्ये किवी फलंदाजाला धावबाद करून इंग्लंडचा विजय निश्चित केला होता. इंग्लंडने पहिल्यांदा आयसीसी विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. दरम्यान, बटलरनंतर तत्कालीन दिग्गज खेळाडू जॅक निकल्सन आणि माइकल फेल्प्स यांनी कोविड-19 विरूद्ध लढाईत मदत करण्यासाठी त्यांच्या संस्मरणीय गोष्टींचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. या मोहिमेत क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि डैरेन गॉफचाही समावेश आहे.

कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीत गरीब आणि वंचितांना मदत करण्यासाठी क्रिकेटपटू पुढे आले आहेत. भारतात, क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडूंनी या व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी आपल्या परीने मदत जाहीर केली आहे. अनेक पैशांच्या मदतीशिवाय वैयक्तिकरित्याही मदत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. यात गौतम गंभीर, हरभजन सिंहसह अन्य प्रसिद्ध खेळाडूंचा समावेश आहे.