कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जगभर झालेल्या प्रसारामुळे क्रीडा उद्योगास मोठा धक्का बसला आहे. फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत अनेक क्रीडा स्पर्धा पुढे ढकलली गेली किंवा रद्द करण्यात आली आहे. आता ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) 18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पुरुषांचा टी-20 वर्ल्ड कपदेखील (T20 World Cup) या व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 2016 मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेच्या शेवटच्या आवृत्तीत वेस्ट इंडीजने जेतेपद जिंकले होते. दोन वर्षाच्या कालावधीत या स्पर्धेचे आयोजन केले जाते. परंतु सध्याच्या परिस्थितीकडे पाहता यावर्षी या स्पर्धेचे आयोजन होण्याची शक्यता खूपच कमी आहे. कोरोना व्हायरसचा वाढत प्रसार होत असल्याने ऑलिम्पिकनंतर आयसीसीवरही (ICC) टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्यासाठी दबाव बनत आहे. आणि या टूर्नामेंट्सच्या आयोजनावर येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. (Tokyo Olympics: टोकियो ऑलिम्पिकच्या नव्या तारखांची घोषणा; आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान पार पडणार स्पर्धा)
अहवालानुसार, 2021 मध्ये खेळायची विंडो उपलब्ध नसल्याने टी-20 विश्वचषक हे 2 वर्ष पुढे म्हणजेच 2022 पर्यंत पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये भारत ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार असून त्यानंतर उन्हाळ्यात बिग बॅश लीगचे (BBL) आयोजन केले जाईल. तसेच मार्च-एप्रिल महिन्यात इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) आयोजन होत असल्याने विश्वचषक स्पर्धेसाठी योग्य काळ नाही. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार सलग दोन टी-20 विश्वचषकचे आयोजित करण्यात येणार होते. तथापि, आता वर्षामध्ये दोन कार्यक्रम आयोजित करणे अयोग्य असेल. आणि त्यामुळे हा कार्यक्रम एक वर्ष पुढे ढकलला जाऊ शकतो. 2011 विश्वचषकचे आयोजन भारतात होणार असल्याचे आधीच ठरलेले आहे. त्यामुळे, आता 2022 मधेच या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळेल.
ऑस्ट्रेलियाने सप्टेंबरपर्यंत आपली आंतरराष्ट्रीय सीमा बंद केली आहे. शिवाय, टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबतचा कोणताही निर्णय मे महिन्यात होणार्या बोर्डाच्या बैठकीच्या मताच्या आधारे घेतला जाऊ शकतो. दरम्यान यापूर्वी कोरोनामुळे ऑलिम्पिक 2020 जुलै 2021 मध्ये सुरू केले जाणार आहे. क्रिकेटविषयी बोलले तर अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द करण्याव्यतिरिक्त सर्व देशांच्या घरगुती क्रिकेटही रद्द करण्यात आल्या आहेत.