Coronavirus: भारतभर कोरोना व्हायरसची थैमान घातले आहे. लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता मिळाल्यामुळे सामान्य नागरिकांनी सावधानी बाळगण्यात देखील शिथिलता दाखवली परिणामी कोरोनाने पुन्हा एकदा देशांतील अनेक राज्यात पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र (Maharashtra), दिल्लीसह (Delhi) अनेक राज्यात पुन्हा एका मोठ्या संख्येने कोरोना व्हायरस (Coronavirus) पॉसिटीव्ह रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशास्थितीत अनेक राज्यांनी लॉकडाऊन न करता कठोर नियमावली जाहीर केली आहे. कोरोनाव्हायरस पुन्हा एकदा आक्रमक होत असताना सध्या काही मुंबई आणि चेन्नई येथे इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) आयोजन करण्यात येत आहे. देशातील सामान्य नागरिकांप्रमाणेच क्रिकेटपटूंमध्ये देखील कोविड-19 ची दहशत पाहायला मिळत आहे. क्रिकेटपटू खेळताना सर्वप्रकारची सावधानी बाळगत आहेत. यादरम्यान, भारतीय संघाचे दिग्गज फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी आपली चिंता व्यक्त केली. (Oxygen Plant Under PM-CARES Fund: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पीएम केयर्स फंडमधून 100 नवीन रुग्णालयांमध्ये उभारण्यात येणार ऑक्सिजन प्लांट)
“मी आत्ता फक्त हेच सांगू शकतो !! आम्ही सर्व....खराब करत आहोत. व्हायरस अगदी माझ्या दारात आहे, तो उद्या तुमच्या दारात येऊन उभा राहील. चला प्रयत्न करू आणि सर्वोत्तम पद्धतींचे अनुसरण करूया” असं लिहीत अश्विनने देशभरातील आपल्या चाहत्यांना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला. दुसरीकडे, भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने आपली निराशा व्यक्त केली. भज्जीने लिहिले, “सर्व काही संपुष्टात येत आहे... आम्ही असहाय आहोत...कोणीही मार्गदर्शन करण्यासाठी नाही, कुठे प्रकाश दिसत नाही... अंधार पडतोय... लोक मरत आहेत... कोणाला काळजी आहे? नाही.” दरम्यान, कोरोनाव्हायरसचा फटका क्रिकेटपटूंसह खेळाडूंना देखील बसत आहे. आयपीएलच्या सुरुवातीपूर्वी खेळाडू आणि सहाय्य्क कर्मचारी कोविड-19 पॉसिटीव्ह आढळले होते तर क्रीडा क्षेत्रातील अन्य खेळाडूं देखील या व्हायरसचा शिकार होत आहेत.
All I can say right now!! We are all spoiling towards ....sday. The virus is right at my doorstep, it will be at yours tomorrow. Let’s try and follow best practices and my sincere prayers🙏🙏🙏 #COVIDSecondWave
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) April 16, 2021
भज्जीची निराशा
Everything coming to an END.. we are clueless..No one is to guide don’t see any light.. it’s getting dark.. people are dying.. someone care ? NO #COVIDEmergency #COVID19India #Covid
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) April 16, 2021
दुसरीकडे, भारतात आज कोरोना बाधितांच्या संख्येत सर्वात रेकॉर्ड-ब्रेक वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासांत 2,17,353 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 1,185 मृतांची नोंद झाली आहे. शिवाय, 1,18,302 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.