Coronavirus संकटात फंड गोळा करण्यासाठी शोएब अख्तरने ठेवला भारत विरुद्ध पाकिस्तान मालिकेचा प्रस्ताव
भारत विरुद्ध पाकिस्तान (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने भारत(India)-पाकिस्तान (Pakistan) टीममध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कोरोना व्हायरसविरुद्ध (Coronavirus) लढाईत दोन्ही देशांसाठी निधी उभारण्यासाठी अख्तरने हा प्रस्ताव समोर ठेवला आहे. अख्तर म्हणाले की, यामुळे जो काही निधी जमा केला जाईल, तो दोन्ही देशांमध्ये कोरोना व्हायरसग्रस्त लोकांच्या मदतीसाठी समानपणे वाटला जाईल. भारत-पाकिस्तानमध्ये अखेर 2012-13 वर्षी मालिका खेळली गेली होती. त्यावेळी पाकिस्तानने भारताचा दौरा केला होता. रावळपिंडी एक्स्प्रेसच्या नावाने प्रसिद्ध अख्तर म्हणाले की, या कठीण काळात दोन्ही देशांनी आपल्या लोकांच्या मदतीसाठी आणि वनडे मालिका खेळून निधी गोळा करण्यासाठी एकत्र यावे. अख्तरने पुढे आपल्या निवेदनात म्हटले की कोरोना रुग्नांची संख्या दोन्ही देशांमध्ये वाढत आहेत, अशा परिस्थितीत हे सामने होणे आवश्यक आहे. (मोहम्मद कैफच्या 2003 वर्ल्ड कप ट्विटवर शोएब अख्तरने दिली मजेदार प्रतिक्रिया, हटके अंदाजात दिले सामना खेळण्याचे चॅलेंज)

परिस्थिती सुधारल्यानंतर लवकरच सामना होण्याची गरज आहे जेणेकरून व्हायरसने बाधित झालेल्यांना मदत करण्यासाठी निधी गोळा करता येईल असा शोएबचा विश्वास आहे. “या संकटाच्या वेळी मला तीन सामन्यांची मालिका प्रस्तावित करायची आहेत ज्यात पहिल्यांदा, दोन्ही देशातील लोक खेळांच्या निकालावर निराश होणार नाहीत,” अख्तर यांनी इस्लामाबादहून पीटीआयला सांगितले. “जर विराटने शतक झळकावले तर आम्हाला आनंद होईल, बाबर आझमने शतक केले तर तुम्हाला आनंद होईल. मैदानावर काहीही झाले तरी दोन्ही संघ विजयी होतील,” तो म्हणाला. “जर भारत आमच्यासाठी 10,000 व्हेंटिलेटर बनवू शकत असेल तर पाकिस्तान हा जेस्चर कायम स्मरणात ठेवेल. पण आम्ही फक्त सामने प्रस्तावित करू शकतो. उर्वरित अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे (ठरविणे), ”अख्तर यांनी पीटीआयला सांगितले.

पाकिस्तान आधारित संघटनांकडून भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि त्यानंतरच्या मुत्सद्दी तणावामुळे 2007 पासून दोन्ही देशांत द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही. ते फक्त आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेत आमने-सामने येतात. दरम्यान, जगभरात 1.4 लाखहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, तर 82 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमावत आहेत. भारतातही कोरोनाग्रस्तांची संख्या 5 हजाराच्या वर जाऊन पोहचली आहे.