Coronavirus: भाजप खासदार गौतम गंभीर ने MPLAD फंडमधून केजरीवाल सरकारला पुन्हा केली लाखो रुपयांची मदत, केजरीवाल यांना लिहिले पत्र
भाजपा खासदार गौतम गंभीर (Photo Credit: IANS)

भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी कोरोना व्हायस (Coronavirus) रूग्णांवर उपचार करण्यासाठी लागणार्‍या वैद्यकीय उपकरणासाठी आपल्या एमपीएलएडी (MPLAD) फंडमधून आणखी 50 लाख रुपये देण्याचे वचन दिले आहे. यापूर्वी त्यांनी एमपीएलएडीमधून 50 लाख रुपये दिले होते आणि दिल्ली सरकारकडे (Delhi Government) प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात आवश्यकता शेअर करण्यासाठी निर्देशित करण्याची विनंती केली होती. रवृत्त संस्था आयएनएसमध्ये नमूद केल्याप्रमाणे,  गंभीर यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे की, दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी दिल्ली सरकारला 50 लाख रुपये देण्याचे वचन दिले होते. खासदार निधीतूनही 50 लाख रुपये देण्याचे मी वचन देतो असे त्यांनी पत्रात लिहिले. रो म्हणाले की दिल्ली सरकारचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी निवेदनात दिले होते की दिल्ली सरकारी रुग्णालयांमधील उपकरणांची कमतरता भागविण्यासाठी निधी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, गंभीरने हे देखील स्पष्ट केले की राज्य सरकारने त्यांच्या घोषणेनंतर त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला नाही. (कोरोना व्हायरसविरूद्ध लढाईत खासदार गौतम गंभीर यांने केली मोठी घोषणा, PM-Cares फंडमध्ये देणार 2 वर्षाचा पगार)

"दोन आठवड्यांपूर्वी मी जे वचन दिले होते त्या 50 लाख व्यतिरिक्त, मी खासदार एलएडीकडून तुमच्या कार्यालयाकडे 50 लाख रुपये देण्याचे वचन देऊ इच्छित आहे. ही रक्कम वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या उपकरणाच्या खरेदी आणि कोविड-19 रूग्णांवर उपचारासाठी उपयुक्त ठरेल." त्यांनी पुढे नमूद केले की, "अधिकाऱ्यांनी आवश्यक गोष्टीमाझ्या कार्यालयाशी शेअर कराव्यात. महामारीच्या या काळात दिल्लीतील नागरिकांचे कल्याण अत्यंत महत्त्व आहे."

दरम्यान, यापूर्वी पूर्व-दिल्लीचे खासदार गंभीरने कोरोना व्हायरसविरूद्ध लढाईत उभारण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थिती निधिला (PM-Cares Fund) पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि मदत म्हणून दोन वर्षांचे वेतन देण्याचे जाहीर केले होते. कोरोना व्हायरसच्या उद्रेकात त्याने मदतसाठी खासदार लोकल एरिया डेव्हलपमेंट स्कीममधून (एमपीएलएडीएस) 1 कोटी रुपये आधीच जाहीर केले आहेत. त्याआधी, भाजप खासदार म्हणाले होते की, त्यांची फाउंडेशन, गौतम गंभीर फाउंडेशन, नवी दिल्लीतील आपल्या मतदारसंघातील गरीब लोकांना अन्नाच्या पाकिटांचे वाटप करत आहे.