रवि शास्त्री (Photo Credits: Getty Images)

Contenders To Replace Ravi Shastri as Indian Coach: भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाच्या काळात जबरदस्त कामगिरी केली आहे, पण मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे योगदान विसरणे हे योग्य ठरणार नाही. त्यांच्या कारकीर्दीत भारताने 2018-19 मालिकेमध्ये ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पहिल्यांदा पराभूत केले. शिवाय, इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायनल सामन्यात त्यांनी स्थानही मिळवले होते. मात्र, सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला अ‍ॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या टेस्ट सामन्यात 8 विकेटने लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. संघाचे आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी 36 अशी धावसंख्येची नोंद केली. त्यामुळे, सोशल मीडियावर रवि शास्त्री यांची हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली. (IND vs AUS 2nd Test 2020-21: टीम इंडिया 'या' 3 कारणांमुळे बॉक्सिंग डे टेस्ट जिंकण्याचा आहे दावेदार, वाचा सविस्तर)

त्यामुळे, आज आपण या लेखात अशा 3 व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत जे शास्त्री यांच्या जागी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षपदासाठी दावा ठोकू शकतात.

1. राहुल द्रविड

या शर्यतीत भारताचा माजी सलामीवीर राहुल द्रविडचेही नाव घेतले जाऊ शकते. द्रविडला यापूर्वी, भारत ‘अ’ आणि अंडर-19 क्रिकेट संघाचा प्रशिक्षकही नियुक्त करण्यात आले होते. शिवाय, त्यांनी भारतीय संघात खेळण्याचा एक चांगला अनुभव असून त्यांनी सध्याच्या सक्रिय संघातील अनेक युवा खेळाडू-पृथ्वी शॉ, शुभमन गिल- सारख्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीच्या अंडर-1 संघाने न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कप विजेतेपद पटकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टेस्ट सामन्यातील पराभवानंतर देखील शास्त्री यांच्या जागी द्रविडला कोच नियुक्त करण्याची मागणी ही करण्यात आली होती. सध्या द्रविड NCA प्रमुख म्हणून व्यस्त आहेत.

2. वीरेंद्र सेहवाग

सेहवाग हा क्रिकेटचा आजवर खेळलेला सर्वात घातक फलंदाजांपैकी एक मनाला जातो. गेल्या वर्षी भारताच्या प्रशिक्षकाची नोकरी 39 वर्षीय सेहवागने प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली असती पण सीओएने शास्त्री यांना पुन्हा या भूमिकेसाठी नेमले. सेहवाग आयपीएल फ्रँचायझी किंग्ज इलेव्हन पंजाबचे सल्लागार आहेत आणि बीसीसीआयने शास्त्री यांना हटविण्याचा निर्णय घेतल्यास माजी भारतीय सलामी फलंदाजाला संधी दिली जाऊ शकते. त्यांनी आतापर्यंत पंजाबसोबत उत्तम कामगिरी केली आहे आणि अनोख्या मार्गांनी गोष्टी चालवण्यासाठी ओळखले जाते.

3. गॅरी कर्स्टन

गॅरी कर्स्टन यांनी भारताबरोबर प्रशिक्षक म्हणून उत्तम काळ व्यतीत केला. कर्स्टनच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी मात केली. त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षणात श्रीलंकेविरुद्ध भारताने पहिल्यांदा श्रीलंकेत पहिल्या द्विपक्षीय मालिका जिंकली आणि 40 वर्षांनंतर न्यूझीलंडविरुद्ध भारताने पहिली कसोटी आणि वनडे आंतरराष्ट्रीय मालिका जिंकली. किर्स्टनच्या कोचिंग कारकिर्दीचा सर्वात सुवर्ण क्षण 2011 मध्ये आला जेव्हा भारताने वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर किर्स्टन यांनी टीम इंडियासी साथ सोडली आणि दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षकपद सांभाळले जिथे त्यांना फारसे यश मिळाले नाही. कर्स्टन यांना भारतीय क्रिकेट चांगले माहित आहे आणि शास्त्रींच्या जागी योग्य उमेदवार असू शकतात.