IND vs AUS 2nd Test 2020-21: ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) टीम इंडियाची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) सुरुवात अपेक्षेनुसार राहिली नाही. पहिल्या कसोटी सामन्यात विराटसेनेला कांगारू संघाने धूळ चारली परंतु दुखापतीमुळे आणि संघाच्या संयोजनामुळे त्यांनाही फटका बसला आहे. बॉक्सिंग डे कसोटीत (Boxing Day Test) भारतीय संघापुढे (Indian Team) मोठे आव्हान आहे आणि पितृत्वाच्या रजेवर मायदेशी गेलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीमुळे या गोष्टी अधिकच कठीण झाल्या आहेत. शिवाय, मोहम्मद शमीला देखील दुखापतीमुळे मालिकेच्या उर्वरित तीन सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कशा प्रकारे मैदानात पुनरागमन करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र मेलबर्न (Melbourne) येथील भारतीय संघाचा रेकॉर्ड पाहता ते विजयाचे दावेदार मानले जात आहे त्यामुळे, आज आपण या लेखात बघणार आहोत अशी तीन कारणं त्यामुळे भारतीय संघ दुसरा कसोटी सामना जिंकूने मालिकेत ऑस्ट्रेलियाची बरोबरी करू शकतो. (IND vs AUS 2nd Test 2020: बॉक्सिंग-डे टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडिया गाठणार शंभरी, MCG मध्ये भारत- कांगारू संघात रंगणार खास सामना)
1. मेलबर्नची खेळपट्टी
मेलबर्नची खेळपट्टी भारतीय खेळाडूंसाठी विशेषतः चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेसाठी उपयुक्त आहे. मागील पाच वर्षात या मैदानावर खेळल्या जवळपास प्रत्येक सामन्यात संघाने 500 धावा केल्या आहेत. दुसरीकडे मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाज या खेळपट्टीबद्दल असमाधानी दिसत आहेत वेगवान गोलंदाज पॅट कमिंसने सामन्यापूर्वी मेलबर्नमधील खेळपट्टी गोलंदाजांसाठी अनुकूल असेल अशी आशा केली.
2. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील इतिहास
अलीकडील इतिहासाचा विचार केल्यास किमान भारताच्या विजयाची एक आशा आहे कारण 2011 पासून भारत मेलबर्नच्या मैदानावर संघाने कसोटी गमावलेला नाही. डाऊन अंडरच्या ऐतिहासिक मालिकेतील विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताने 2018 मध्ये एक प्रसिद्ध विजय मिळविला होता. माइकल क्लार्कच्या कांगारू संघाकडून 122 धावांनी पराभव पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये बॉक्सिंग डे कसोटी गमावणारा एमएस धोनी हा अखेरचा भारतीय कर्णधार होता. उल्लेखनीय म्हणजे, ऑस्ट्रेलियाच्या इतर ठिकाणांच्या तुलनेत मेलबर्नला प्राधान्य दिले आहे कारण आयकॉनिक एमसीजीमध्ये त्यांचा रेकॉर्ड चांगला आहे. 13 पैकी 3 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवाल तर 8 सामने गमावले आणि 2 टेस्ट सामानाने अनिर्णित राहिले.
3. चेतेश्वर पुजाराने 2018-19 दौर्यात या मैदानावर ठोकले होते शतक
टीम इंडियाचा 2018-19 ऑस्ट्रेलिया दौरा विशेष राहिला होता. दौऱ्यामधील तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे झाला होता ज्यात भारताने 'टेस्ट स्पेशलिस्ट' चेतेश्वर पुजाराच्या दमदार खेळीच्या जोरावर विजय मिळवला होता. पुजाराने पहिल्या डावात 106 धावांची उत्तम खेळी केली होती आणि भारताने 137 धावांनी सामना जिंकला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध यंदाच्या दौऱ्यात देखील पुजाराने पहिल्या डावात प्रभावी बॅटिंग केली होती त्यामुळे यंदा देखील कर्णधार अजिंक्य रहाणेला पुजाराकडून अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील दुसरी टेस्ट मॅच 26 डिसेंबरपासून खेळली जाईल. भारतीय वेळेनुसार सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट सकाळी 5 पासून उपलब्ध असेल.