Christmas 2020: ख्रिसमस (Christmas) 2020 च्या निमित्ताने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सांता क्लॉज (Santa Claus) बनला आणि आपल्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. ख्रिसमस हा ख्रिश्चनांचा सर्वात महत्वाचा सण आहे आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. दरवर्षी 25 डिसेंबरला हा खास दिवस साजरा केला जातो आणि जगभरातील लोक या कार्यक्रमाचा आनंद लुटतात. ख्रिसमस 2020 चिन्हांकित करत मास्टर ब्लास्टरने इंस्टाग्रामवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने सान्ता क्लॉजच्या पोशाखातील चाहत्यांना 'मेरी ख्रिसमस'च्या शुभेच्छा दिल्या. 2011 वर्ल्ड कपच्या विजेत्या फलंदाजाने आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी आजचा दिवस खास बनवावा असे सांगत एक महत्त्वपूर्ण संदेश दिला. (Merry Christmas 2020 Wishes in Marathi: नाताळ च्या शुभेच्छा Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन एकमेकांना म्हणा 'मेरी ख्रिसमस')
"प्रत्येकाला मेरी ख्रिसमस! ख्रिसमस नेहमीच एकत्र राहून देण्याविषयी असतो. अगदी आपल्या आसपासच्या लोकांसाठी अगदी अगदी लहान मार्गांनीही ते खास बनवू या. # क्रिसमस," सचिनने व्हिडिओ सामायिक करताना लिहिले. क्रिकेटच्या देवाला सांता क्लॉजकडे बनलेले पाहून अनेकांनी मास्टर-ब्लास्टरच्या लूकचे कौतुक केले तर अनेकांनी त्याला 'मेरी ख्रिसमस' शुभेच्छा दिल्या. पहा पोस्ट:
View this post on Instagram
दरम्यान, यापूर्वी सचिनने नाताळचा सण साजरा करत सामाजिक भान जपलं आणि बच्चे कंपनींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम केले आहे. सचिनने दोन वर्षांपूर्वी सांताक्लॉज बनून गरीब घरांतील मुलांसाठी कार्य करत असलेल्या आश्रय चाईल्ड केअर सेंटरला भेट दिली आणि आपल्या लाडक्या क्रिकेटरला बाहुला लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. मास्टर-ब्लास्टरने या मुलांसोबत घालवलेल्या क्षणांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता आणि या निष्पाप मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अमुल्य होतं असं म्हटलं. दुसरीकडे, सचिन सध्या आपल्या घरी नाताळचा सण साजरा करत असला तरी तो ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील कसोटी सामन्यावरही लक्ष ठेवून आहे. अॅडिलेड ओव्हलमधील पहिल्या पिंक-बॉल टेस्ट सामन्यात 8 विकेटने पराभवानंतर भारतीय संघापुढे पुनरागमन करण्याचे कठीण आव्हान आहे. शिवाय, विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीने संघाच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे.