Merry Christmas 2020 Wishes (Photo Credits: File)

Christmas 2020 Wishes in Marathi: नाताळ म्हटलं की नागरिकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतो. लोकांपेक्षा लहान मुलांसाठी ख्रिसमस (Christmas) सण म्हणजे एक पर्वणीच असते. ख्रिसमस मध्ये सांताक्लॉज बनवणे, ख्रिसमस ट्री बनवणे यासाठी लहान मुलांमध्ये विशेष उत्साह असतो. त्याचबरोबर चॉकलेट्स, केकची ख्रिसमसमध्ये खैरात असल्याने बच्चे कंपनी प्रचंड आनंदात असते. 25 डिसेंबर हा दिवस जगभरात ख्रिसमस म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म झाला. त्यामुळे वाढदिवसानिमित्त जगभरात हा सण जल्लोषात साजरा केला जातो. या दिवशी सोशल मिडियाद्वारे एकमेकांना ख्रिसमस सणाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

यंदा कोरोना व्हायरसमुळे आपण एकत्रितरित्या येऊन हा सण साजरा न करता व्हॉट्सअॅप, फेसबुक, मेसेजेसच्या माध्यमातून एकमेकांना शुभेच्छा पाठवू शकतो. त्यासाठी तुम्हाला चांगल्या शुभेच्छा संदेशाची गरज भासेल. म्हणूनच तुमच्यासाठी खास 'Merry Christmas' च्या शुभेच्छा:

नाताळचा हा सण आनंद घेऊन आला तुमच्या दारी

ख्रिसमस ट्री, रोषणाईने उजळून गेली दुनिया सारी

नाताळ सणाच्या सर्वांना शुभेच्छा

Merry Christmas 2020 Wishes (Photo Credits: File)

ख्रिसमसच्या दिवशी नाताळ बाबा आपल्यावर करतो भेटवस्तूंची बरसात

'जिंगलबेल' चे गाणे गाऊन मंगलमयी वातावरणात करु या दिवसाची सुरुवात!!

Merry Christmas!

हेदेखील वाचा- Christmas 2020: नाताळ सणासाठी 'क्रिसमस ट्री' ला का आहे विशेष महत्व; जाणून घ्या यामागचे मूळ कारण

Merry Christmas 2020 Wishes (Photo Credits: File)

सुख, समृद्धी, निरोगी आयुष्य घेऊन येवो ख्रिसमसची ही रात्र

 एकत्र येऊन नाताळ सण साजरा करण्याचे निरंतर राहो हे सत्र

 ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा

Merry Christmas 2020 Wishes (Photo Credits: File)

 नाताळ सणा दिवशी पूर्ण होवो तुमच्या सर्व मनोकामना

 सुख, समृद्धी लाभो तुम्हास हीच प्रभू येशू चरणी प्रार्थना

 ख्रिसमसच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

Merry Christmas 2020 Wishes (Photo Credits: File)

वर्षाअखेरीस आला नाताळचा सण

आनंदाने साजरा करूया या दिवसाचा प्रत्येक क्षण

नाताळ सणाच्या सर्वांना शुभेच्छा

Merry Christmas 2020 Wishes (Photo Credits: File)

जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. वेळ कोणतीही असो मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून आदल्या दिवसांपासूनच शुभेच्छांचा वर्षाव सुरु होतो. त्यामुळे तुम्ही यंदा ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात कुठेही कमी पडू नये म्हणून एक दिवस आधी तुमच्यासाठी नाताळच्या या खास शुभेच्छा नक्की कामी येतील.