पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटर मुश्ताक अहमद यांचा दावा, गेल-रसेल यांना माहित होते इंग्लंडविरुद्ध भारताच्या 2019 वर्ल्ड कप पराभवाचे रहस्य
मुश्ताक अहमद, बेन स्टोक्स, एमएस धोनी (Photo Credit: Getty)

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) याने त्याच्या आत्मचरित्र्यात इंग्लंडच्या वर्ल्ड कप (World Cup) विजयासंदर्भात लिहिले आहे. स्टोक्सने भारताविरुद्ध (India) विजयाचा देखील उल्लेख केला आहे ज्यामुळे आता एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. ग्रुप स्टेजच्या एका सामन्यात इंग्लंडसमोर करो-या-मरो ची स्थिती असताना टीम इंडियाचे आवाहन होते. भारत-इंग्लंडमधील सामन्यावर पाकिस्तानचेही (Pakistan) भविष्य अवलंबून होते. पण, इंग्लंडने सामना जिंकला आणि पाकिस्तानला सेमीफायनल आधीच मायदेशी परतावे लागले. या मॅच दरम्यान टीम इंडियाचा विकेटकिपर-फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) याच्याकडून विजयाचा प्रयत्न न केल्याचा दावा स्टोक्सने केला, त्यानंतर भारत जाणीवपूर्वक सामना हरला असे पाकिस्तानी खेळाडूंचे आरोपपत्र सुरु झाले. यात आता पाकिस्तानचे माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुश्ताक अहमद (Mushtaq Ahmad) यांनाही उडी मारली. उपांत्य सामन्यात भारताला पाकिस्तानला पाहायचे नाही असे वेस्ट इंडिज खेळाडूंनी त्यांना सांगितले असल्याचे मुश्ताक यांनी दावा केला. ('टीम इंडिया 2019 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध मुद्दाम हरली असे कधीही म्हटले नाही', माजी पाकिस्तानी क्रिकेटरच्या वक्तव्यावर बेन स्टोक्सची संतप्त प्रतिक्रिया)

"मी गेल्या वर्षीच्या विश्वचषकात वेस्ट इंडीज संघाबरोबर काम करत होतो. इंग्लंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर जेसन होल्डर, क्रिस गेल आणि आंद्रे रसेल मला म्हणाले, मुश्या, भारताला पाकिस्तानला उपांत्य फेरीत पाहण्याची इच्छा नव्हती," असे पाकप्रेसचे संपादक साज सादिक यांनी अहमचे विधान ट्विट केले. आयसीसीच्या या प्रतिष्टीत स्पर्धेत पाकिस्तानचा रोलर-कोस्टर प्रवास होता. 9 सामन्यांमधील 5 विजयासह पाकिस्तानने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवले. विराट कोहलीच्या टीमने इंग्लंडला हरवले असते तर उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या त्यांच्या आशा वाढवता आल्या असत्या. या वादानंतर स्टोक्सने एका यूजरला प्रतिसाद देताना या आपण असे काही म्हटले नाही असे स्पष्ट केले.

यापूर्वी पाकिस्तानचे माजी अष्टपैलू अब्दुल रझाक यांनीही भारताच्या नुकसानीबाबत अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती. "यात काही शंका नाही. मी त्यावेळी ते देखील सांगितले होते. धोनीसारखा फलंदाज जो चौकार आणि षटकार ठोकू शकतो, तो फक्त सर्व काही डिफेंड करत होता," रझाक म्हणाला.