अबब! टीम इंडियाच्या 'या' 5 फलंदाजांनी कसोटी क्रिकेटच्या एका डावात खेळले सर्वाधिक बॉल्स, 'हा' टेस्ट स्पेशलिस्ट खेळला 525 चेंडू
चेतेश्वर पुजारा (Photo Credit-Getty Images)

कसोटी क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अमर्यादित ओव्हर्सचे स्वरुप आहे. क्रिकेटच्या या सावरत मोठ्या आणि कदाचित खेळाडूंकडून अधिक पसंत केल्या जाणाऱ्या क्रिकेट फॉरमॅटच्या इतिहासात मागील अनेक वर्षातील सामन्यांमध्ये कित्येक फलंदाजांनी मोठ्या खेळी खेळल्या आहेत. फलंदाज असंख्य तास मैदानावर टिकून राहतात आणि अधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. या दरम्यान त्यांना अनेक चेंडूंचा सामना करावा लागतो. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि 'द वॉल' म्हणून ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडने आपल्या टेस्ट करिअरमध्ये एकूण 31,258 चेंडूंचा सामना केला. इतकंच नाही तर भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये देखील असे अनेक खेळाडू ज्यांनी टेस्ट सामन्याच्या एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना केला आहे. आणि यामध्ये टीम इंडियाच्या एका टेस्ट स्पेशलिस्ट खेळाडूचे नाव सर्वात अव्वल स्थानावर आहे.

आज आपण पाहणार आहोत असे पाच भारतीय फलंदाज ज्यांनी टेस्टच्या एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना केला आहे. (Indian Captain with 100% win Record: भारताच्या 'या' 2 कर्णधारांच्या नेतृत्वात टीम इंडियाने टेस्ट क्रिकेटमध्ये मिळवला 100% विजय)

चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)

टीम इंडियाचा अनुभवी कसोटी फलंदाज पुजाराने एका डावात सर्वाधिक 525 चेंडूंचा सामना करण्याच्या विक्रमाची नोंद केली आहे. पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2017 मध्ये 202 धावांच्या खेळीत हा पराक्रम केला आहे.

राहुल द्रविड (Rahul Dravid)

टीम इंडियाचा माजी फलंदाज द्रविडचाही या यादीत समावेश आहे. द्रविडने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 2004 कसोटी सामन्याच्या एका डावात 495 चेंडूत 270 धावांची खेळी केली होती.

नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu)

भारताचे माजी फलंदाज आणि राजकारणी सिद्धू यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 1997 कसोटी सामन्यात 294 चेंडू खेळले आणि द्विशतकी डाव खेळला. सिद्धू यांनी 201 धावा केल्या होत्या.

रवि शास्त्री (Ravi Shastri)

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांचाही या एलिट यादीत समावेश आहे. शास्त्री यांनी 1992 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याच्या एका डावात 477 चेंडूंचा सामना करत द्विशतकी धावसंख्या गाठली. शास्त्रींनी या सामन्यात 206 धावा फाटकावल्या.

सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)

'लिटिल मास्टर' म्हणून ओळखले जाणार आणि टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा आकडा गाठणारे टीम इंडियाचे माजी कर्णधार गावस्कर यांनी इंग्लंडविरुद्ध 1981 च्या मालिकेच्या सामन्यात 472 चेंडू खेळले. मात्र, वरील चार फलंदाजांप्रमाणे गावस्कर द्विशतकी धावसंख्या गाठू शकले नाही. गावस्कर त्या सामन्यात 172 धावांपर्यंतच मजल मारू शकले.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक चेंडू खेळण्याचा विक्रम इंग्लंडचे सर लेन हटन यांच्या नावावर आहे. सर हटन यांनी द ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1938 कसोटी सामन्यात 364 धावांची त्रिशतकी खेळी केली होती. दरम्यान त्यांनी सर्वाधिक 847 चेंडूंचा सामना केला होता. हटन हे कसोटीच्या एका डावात 800 पेक्षा जास्त चेंडू खेळणारे जगातील एकमेव फलंदाज आहेत.