Indian Captain with 100% win Record: विराट कोहली सध्या क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. कोहली हा सर्व फॉर्मेटमध्ये सध्याचा भारतीय कर्णधार आहे. भारतीय क्रिकेटमधील काही असे नियमित कर्णधार आहे ज्यांनी चांगली सुरुवात केली आणि संघाचे नेतृत्व करत क्रिकेटच्या मोठ्या फॉरमॅटमध्ये एकदाही पराभवाची चव चाखली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये आजवर तब्बल 33 खेळाडूंनी टीम इंडियाचे कर्णधार म्हणून नेतृत्व केले आहेत. यातील काही इतिहास जमा झाले तर काहींचे आकडे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरत आहेत. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सध्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संघाने कर्णधार म्हणून नेतृत्व करत आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटमध्ये असे फक्त दोन कर्णधार आहेत ज्यांच्या नेतृत्वात संघाने 100 टक्के विजय मिळवला आहे जे केवळ काही क्रिकेट चाहत्यांनाच माहित असेल. (Fastest Centuries by Indian in Test: टेस्ट क्रिकेटमध्ये 'या'6 भारतीय फलंदाजांनी ठोकले वेगवान शतके, 'हा' माजी कर्णधार आहे No 1)
आजच्या या लेखात आपण या दोन भारतीय टेस्ट कर्णधारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या नेतृत्वात संघाने एकही सामना गमावला नाही.
रवि शास्त्री
कसोटी सामन्यात 100% विजय नोंदवणाऱ्या केवळ दोन भारतीय कर्णधारांपैकी टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक एक आहेत. शास्त्रीच्या नेतृत्वात भारताने 1988 मध्ये चेन्नईवर वेस्ट इंडिज जिंकला होता. भारताने चेन्नई कसोटी 255 धावांनी जिंकली आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत केली. कर्णधार म्हणून शास्त्री यांचा हा एकमेव टेस्ट सामना होता. दुसरीकडे, त्यांची एकदिवसीय कामगिरी फारशी चांगली ठरली नाही. शास्त्री यांच्या नेतृत्वात भारताने 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये फक्त 4 विजय नोंदवले.
अजिंक्य रहाणे
मुंबईकर रहाणेने 2017मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाला येथील कसोटी सामन्यात संघाचे पहिल्यांदा विजयी नेतृत्व केले होते. त्यानंतर, रहाणेला अफगाणिस्तानविरुद्ध बेंगलोर येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पुन्हा एकदा नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. अफगाणिस्तानचा हा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता ज्यात टीम इंडियाने डाव आणि 262 धावांनी विजय मिळवला. आणि अखेर 2020-21 ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मेलबर्नच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत सलग तीन टेस्ट मॅच जिंकणारा एमएस धोनीनंतर तिसरा कर्णधार ठरला.
सीके नायडू, हे टीम इंडियाचे पहिले कसोटी कर्णधार होते, तर 33वा टेस्ट कर्णधार विराट या फॉरमॅटमधील देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. विराटच्या नेतृत्वात संघाने 33 कसोटी सामने जिंकले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रहाणेची खरी कसोटी आहे आणि सिडनी येथे सुरु असलेल्या सामन्यात विजय मिळवल्यास मुंबईकर फलंदाज धोनीनंतर सलग चार कसोटी सामने जिंकणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरू शकतो.