Fastest Centuries by Indian in Test: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) देशाचे प्रतिनिधित्व करत शतक ठोकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. टी-20 क्रिकेट सुरू झाल्यामुळे फलंदाजांनी वनडे आणि कसोटी सामन्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे आणि वेगाने धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक ठोकणे हे जगातील कोणत्याही फलंदाजासाठी नेहमीच गौरवशाली असते, पण कसोटी सामन्यातील शतक मात्र सर्वात समाधानी असते. कसोटी सामन्यांमध्ये स्कोअरिंग रेट हा एक मोठा घटक मानला जात नाही, परंतु वेगाने तीन-आकडी धावसंख्या केल्याने संघाला दोन वेळा विरोधासाठी मागे टाकण्यास अधिक वेळ मिळतो. 51 शतकांसह कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. ब्रेंडन मॅक्युलमने कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक ठोकले आहे. त्याने फेब्रुवारी 2016 मध्ये क्राइस्टचर्च येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या 54 चेंडूत शतकी फटकेबाजी केली होती. (Captains Who Couldn't Win A Test Match In India: अरे बाप रे! 'हे' 3 आक्रामक कर्णधार भारतामध्ये नाही जिंकू शकले एकही टेस्ट मॅच, नावं नक्कीच करतील हैराण)
अशा स्थिती आज आपण या लेखत जाणून घेणार आहोत कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्या भारतीय फलंदाजांनी किती वेगवान कसोटी शतक झळकावले आहे.
1. मोहम्मद अझरुद्दीन
कसोटी क्रिकेटमध्ये एका भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वात वेगवान शतकाच्या यादीत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन पहिल्या स्थानावर आहे. अझरुद्दीनने नोव्हेंबर 1996 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात अवघ्या 74 चेंडूंत शतकी खेळी केली. पॉल अॅडम्सच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी अझरने 77 चेंडूत 109 धावा केल्या. खेळीच्या वेळी त्याने 18 चौकार आणि एक षटकार लगावला. यामध्ये लान्स क्लूसरच्या एका षटकात 5 चौकारांचा समावेश होता.
2.कपिल देव
अझरपूर्वी, भारताचे माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव यांनी श्रीलंकेविरुद्ध डिसेंबर 1986 मध्ये अवघ्या 74 चेंडूत कसोटी शतक ठोकले होते. कानपुरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात कपिल देवने मोहम्मद अझरुद्दीनबरोबर सहाव्या विकेटसाठी 272 धावांची भागीदारी केली आणि 163 धावा केल्या. त्यांनी या खेळीत 165 चेंडूंचा सामना करत 19 चौकार आणि षटकार खेचला.
3. वीरेंद्र सेहवाग
भारतीय फलंदाजाच्या तिसऱ्या वेगवान कसोटी शतकाचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. जून 2006 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने 78 चेंडूत शतक ठोकले होते. डायनॅमिक ओपनर190चेंडूत 180 धावा करून माघारी परतला. नजफगडच्या नवाबने आपल्या खेळीत 20 चौकार आणि 2 षटकार मारले. द्रविड आणि मोहम्मद कैफ यांनी शतके ठोकत 588/8 च्या स्कोअरवर भारताने आपला पहिला डाव घोषित केला.
4. शिखर धवन
धवनने कसोटी क्रिकेटमधील भारतीय फलंदाजाकडून तिसऱ्या जलद शतकाची नोंद केली आहे. मार्च 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहालीमध्ये धवनने फक्त 85 चेंडूत शतक साजरे केले. कसोटी सामन्यात पदार्पण करणारा धवन मुरली विजयबरोबर सलामीला आला. विजय एका बाजूने सावध खेळ करत असताना धवन आक्रमक फॉर्ममध्ये होता. धवनने ऑस्ट्रेलियाच्या सर्व गोलंदाजांची चांगलीच धुलाई काली आणि केवळ 85 चेंडूत शतक झळकावले, जे कसोटी पदार्पणातील सर्वात वेगवान आणि भारतीय फलंदाजाकडून एकूण चौथे वेगवान शतक ठरले.
5. हार्दिक पांड्या
कसोटी क्रिकेटमधील भारतीय फलंदाजाकडून संयुक्त पाचवा वेगवान शतक झळकावत हार्दिक पांड्याने कपिल देव यांचे अनुकरण केले. हार्दिकने 86 चेंडूंत ऑगस्ट 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध पाचवे वेगवान कसोटी शतक ठोकले. हार्दिकने 61 चेंडूंत 50 धावा करून खेळत असताना मोहम्मद शमीच्या रूपात भारताने 9वी विकेट गमावली. उमेश यादव हा अखेरचा फलंदाज असल्याने पांड्याने पुढचे अर्धशतक केवळ 25 चेंडूत पूर्ण करत 86 चेंडूत कसोटी शतक झळकावले. अखेर तो96 चेंडूत 108 धावा करून बाद झाला. या खेळीत पांड्याने 8 चौकार आणि 7 षटकार लगावले. कपिल देवने कानपूरमध्ये इंग्लंडविरुद्ध 1981/82 मध्ये प्रथम विक्रम केला होता.