टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे (Border-Gavaskar Trophy) काउंटडाऊन सुरू झाले आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपुरात (Nagpur) खेळवला जाणार असून, त्यासाठी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ चांगलाच घाम गाळत आहेत. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या दोन संघांमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये चेतेश्वर पुजारा सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे. चेतेश्वर पुजारानेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 शतके झळकावली आहेत.
चेतेश्वर पुजाराने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 कसोटी सामने खेळले असून यादरम्यान त्याने आपल्या बॅटने 1893 धावा केल्या आहेत. यादरम्यान चेतेश्वर पुजाराने 5 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेतेश्वर पुजाराची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 204 धावा आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजारा पहिल्या क्रमांकावर आहे. पुजाराच्या एकूण कसोटी कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 168 डावात 7014 धावा केल्या आहेत. (हे देखील वाचा: IND vs AUS Test Series 2023: बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार नागपूर मध्ये, जाणून घ्या कशी आहे येथील आकडेवारीवर)
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 सामन्यात 3630 धावा केल्या आहेत. यादरम्यान सचिन तेंडुलकरने 11 शतके आणि 16 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने 29 सामन्यात 2555 धावा केल्या आहेत. त्याने 8 शतके आणि 12 अर्धशतके केली आहेत. या यादीत राहुल द्रविड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने 2143 धावा केल्या आहेत.
विशेष म्हणजे टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीत होणार आहे. तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार आहे. यानंतर 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये शेवटचा सामना खेळवला जाईल.