अंडर-19 विश्वचषकाचा (Under-19 World Cup) पहिला सामना यजमान वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया (West Indies vs Australia) यांच्यात खेळला गेला. पण, पहिल्या सामन्यात भारतीय अष्टपैलू खेळाडूने वर्चस्व गाजवले. भारतातील चेन्नई येथील रहिवासी असलेल्या निवेथान राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) यांनी ऑस्ट्रेलियाच्या वतीने वेस्ट इंडिजविरुद्ध जबरदस्त गोंलदाजी केली. राधाकृष्णनने दोन्ही हातांनी गोलंदाजी करत 3 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या 6 गडी विजयात मोठा वाटा उचलला. राधाकृष्णन उजव्या हाताने ऑफ स्पिन आणि डाव्या हाताने स्पिन करू शकतात. तो उजव्या हाताने मध्यमगती वेगवान गोलंदाजीही करू शकतो. तो एक फलंदाजही आहे. त्याच्या या कलेमुळे तो एक आश्चर्यकारक क्रिकेटर बनला आहे. 25 नोव्हेंबर 2002 रोजी चेन्नईमध्ये जन्मलेले राधाकृष्णन 10 वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब सिडनीला गेले. त्याने 2017 आणि 2018 मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये आपली क्षमता दाखवली.
Tweet
🔸 Ackeem Auguste's exquisite shot
🔸 A dream delivery from Nivethan Radhakrishnan
🔸 Teague Wyllie's perfectly placed four
Who gets your vote for the @Nissan #POTD from Match 1 of the #U19CWC 2022?
🗳️ → https://t.co/MauDPcWOCc pic.twitter.com/P9HxkXNOw5
— ICC (@ICC) January 14, 2022
वडीलही क्रिकेटपटू राहिले आहेत
2019 मध्ये, तो पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या 16 वर्षाखालील संघाकडून खेळला. 2021 मध्ये, तो IPL च्या फ्रँचायझी दिल्ली कॅपिटल्सचा नेट बॉलर देखील होता. राधाकृष्णन यांचे वडील अन्बू सेल्वन यांनी तामिळनाडूसाठी कनिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळले आहे. 2013 मध्ये सिडनीला गेल्यानंतर राधाकृष्णन यांनी न्यू साउथ वेल्सचे प्रतिनिधित्व केले. (हे ही वाचा IND vs SA 3rd Test: दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाचे स्वप्न भंगल्यानंतर Virat Kohli चे दुखणे आले समोर, ‘या’ गोष्टीवर फोडले पराभवाचे खापर)
जेव्हा तो 6 वर्षांचा होता तेव्हा तो डाव्या हाताने स्पिन करत असे, नंतर ऑफ स्पिनचा प्रयत्न देखील केला. गरज भासल्यास तो उजव्या हाताने मध्यमगती वेगवान गोलंदाजीही करू शकतो. वयाच्या 8 व्या वर्षी त्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या निम्न विभागीय लीगमध्ये हॅटट्रिक घेतली. दोन वर्षांनंतर, तो सिडनीला गेला आणि तेथे न्यू साउथ वेल्स ज्युनियरसाठी सलामी दिली, त्याने नाबाद 193 धावांची खेळी खेळली.