टीम इंडियाच्या सुपर फॅन, 'क्रिकेट दादी' नावाने प्रसिद्ध, चारुलता पटेल यांचे निधन, BCCI ने वाहिली श्रद्धांजली
(Photo Credit: Instagram)

आयसीसी विश्वचषक (World Cup) 1029 दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला भेटणारी 87 वर्षीय सुपर फॅन चारूलता पटेल (Charulata Patel) यांचे निधन झाले आहे. टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंना भेटल्यावर, त्यांच्या उत्साह पाहून चारुलता यांना 'क्रिकेट दादी' अशा नावाने प्रसिद्धी मिळाली.  इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान चारुलता स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी टीम इंडियाला पाठिंबा दर्शविला होता. इतकेच नव्हे तर कर्णधार कोहलीपासून उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनीही त्यांना भेटून आशीर्वाद घेतला होता. 13 जानेवारी रोजी चारुलता पटेल यांचे निधन झाले. विश्वचषकातील भारत आणि बांग्लादेश संघातील सामन्यानंतर चारुलता पटेलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आणि प्रत्येकजण त्यांच्याबद्दल चर्चा करत होते. क्रिकेटविषयी त्यांचा उत्साह पाहून विराट आणि रोहितही आश्चर्यचकित झाले होते. टीम इंडियाची भेट घेतल्यानंतर पेप्सीने त्यांची स्वैग मोहिमेचा चेहरा म्हणून त्यांची निवडही केली होती. शिवाय, 1983 मध्ये कपिल देव यांच्या संघाने फायनलयामध्ये वेस्ट इंडीजचा पराभव करत पहिल्यांदा विश्वचषक जिंकला असताना त्या लॉर्ड्सच्या मैदानावर हजर होत्या.

चारुलता यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) त्यांना श्रद्धांजली वाहिली. बीसीसीआयने (BCCI) म्हटले की, "टीम इंडियाची सुपर फॅन चारुलता पटेलजी नेहमीच आपल्या मनात राहतील आणि त्यांच्या खेळाबद्दलची उत्कटता आम्हाला सतत प्रेरित करेल. तिच्या आत्म्याला शांती लाभो."  चारुलता यांच्या मृत्यूची बातमी देताना तिच्या नातवाने लिहिले, "मी तुम्हाला सांगत असलेले मनापासून आहे, आमच्या सुंदर आजीने 13/01 रोजी सायंकाळी 5.30 वाजता शेवटचा श्वास घेतला. ती एक सुंदर लहान स्त्री होती, हे खरं आहे की छोट्या छोट्या गोष्टी छोट्या पॅकेजेसमध्ये येतात 'आमच्या आजी आनंदी होत्या, ती खरोखर विलक्षण होती. ती आमचे जग होती."

चारुलता या भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्या होत्या आणि त्यांनी इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान टीम इंडियाची भेट घेतली होती. जिथे त्यांनी रोहित आणि विराटला आशीर्वाद दिला. यानंतर विराटने त्यांच्यासाठी उर्वरित सामन्यांच्या तिकिटांची व्यवस्था केली होती. विराटनेही तिकिटावर एक खास संदेशही लिहिला होते.