
Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या शेवटच्या लीग सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाची गोलंदाजी उत्कृष्ट होती, विशेषतः फिरकी गोलंदाजांनी किवी फलंदाजांना जास्त काळ क्रीजवर टिकू दिले नाही. न्यूझीलंडसाठी केन विल्यमसनने चांगली खेळी केली असली तरी तो त्याच्या संघाला विजयाकडे नेऊ शकला नाही. अक्षर पटेलच्या चेंडूवर विल्यमसन आऊट झाला. केएल राहुलने त्याला स्टंप आऊट केले.
कोहलीने अक्षरचे पाय धरले
केन विल्यमसन फलंदाजी करत असताना न्यूझीलंड सामना सहज जिंकेल अशी अशा होती. परंतु, अक्षर पटेलने विल्यमसनला आऊट करून टीम इंडियाला मोठे यश मिळवून दिले. विल्यमसनच्या विकेटने सामन्याचा संपूर्ण मार्ग बदलला होता. यानंतर, आनंद व्यक्त करत विराट कोहलीने मैदानावर अक्षर पटेलचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
मात्र, अक्षरने त्याला पाय पकडण्यापासून रोखले आणि दोघांनीही मैदानावर हास्यविनोद केला. या सामन्याचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात अक्षर पटेलने उत्तम गोलंदाजी सादर केली. गोलंदाजी करताना अक्षरने 10 षटकांत फक्त 32 धावा देत 1 विकेट घेतली.
Kohli touching Axar Patel's feet after he got Williamson out 😭#Kohli #AxarPatel #INDvNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/mJmgQ95Y15
— Tarun Lulla (@ayotarun) March 2, 2025
विल्यमसनने 81 धावांची खेळी केली
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने किवी संघासमोर विजयासाठी 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण न्यूझीलंड संघ 205 धावांवर ऑलआउट झाला. न्यूझीलंडकडून फलंदाजी करताना केन विल्यमसनने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. ज्यासाठी त्याने 120 चेंडूंचा सामना केला.