Rohit Sharma New Milestone: धर्मशाळा कसोटीत कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला
Rohit Sharma (Photo Credit - X)

IND vs ENG 5th Test: टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी (IND vs ENG 5th Test) मालिकेतील शेवटचा सामना धर्मशाळा (Dharamshala) येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) क्षेत्ररक्षण करताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. या सामन्यात रोहित शर्माने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना एक झेल घेतला, त्यानंतर रोहित शर्मा क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये 60 किंवा त्याहून अधिक झेल घेणारा पहिला खेळाडू ठरला. (हे देखील वाचा: R Ashwin And Kuldeep Yadav Viral Video: बेसबॉलचा बँड वाजवल्यानंतर अश्विन आणि कुलदीपमध्ये झाली तू तू मै मै, व्हिडिओ पाहून तुम्हालाही येइल हसू Watch)

रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 60 झेल केले पूर्ण

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात रोहित शर्माने स्टार गोलंदाज आर अश्विनच्या चेंडूवर स्लिपमध्ये इंग्लंडचा फलंदाज मार्क वुडला झेलबाद केले, त्यानंतर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये 60 झेल पूर्ण केले. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 93 झेल आहेत, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माने 60 झेल घेतले आहेत.

रोहित शर्माचे सर्व फॉरमॅटमध्ये झेल:

कसोटी – 60*

एकदिवसीय- 93

टी-20 आंतरराष्ट्रीय – 60

तिन्ही फॅारमॅटमध्ये 60 झेल घेणारा पहिला क्षेत्ररक्षक

या झेलसह रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 60 झेल घेणारा जगातील पहिला क्षेत्ररक्षक बनला आहे. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर धर्मशाळा कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडचा संघ 218 धावांत गारद झाला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली होती. सलामीवीर जॅक क्रोली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली.

भारताने पहिल्याच दिवशी सामन्यात पकड 

यानंतर फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे टीम इंडियाने सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपली पकड मजबूत केली. इंग्लंडकडून पहिल्या डावात जॅक क्रॉलीने सर्वाधिक ७९ धावांची खेळी केली. कुलदीप यादवने कसोटी कारकिर्दीतील चौथा फिफर पूर्ण केला आहे. तर आर अश्विनने 100 व्या कसोटी सामन्यात 4 विकेट घेतल्या आहेत. रवींद्र जडेजानेही एक विकेट घेतली.